🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 18
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ऑपरेशन स्पायडरवेब नंतर रशियाने प्रत्युत्तरादाखल युक्रेनमध्ये केलेल्या हल्यांची व्याप्ती आता युक्रेनच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकली आहे. युक्रेनला होणाऱ्या युद्धसामुग्रीचा ९०% पुरवठा पोलंडच्या रेड्झिकोव्हो हवाई तळावरून होत आहे. पाकिस्तानच्या नूरखान हवाई तळाइतकं याचं महत्व आहे. युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यांपासून हा हवाई तळ फक्त ८० किमी दूर आहे. डोनाल्ड ट्रम्प डीपस्टेटच्या जाळ्यात अडकल्यानंतर ल्वादिमीर पुतीन जास्तच सावध झालाय आणि अमेरिकेची मिनरल डील मोडल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात नाटोच्या ऑपरेशन स्पायडरवेब नंतर रशियाने आपलं तंत्र पुन्हा बदललं आहे आणि आता फक्त पूर्व युक्रेन नाही तर संपूर्ण युक्रेन रशियाचा भाग असेल या योजनेवर काम सुरू झालं आहे. उद्या चर्चेसाठी परत वेळ आलीच तर रशिया आता सगळा युक्रेन मागेल आणि नाटोचा गाशा गुंडाळायला सांगेल. तोपर्यंत अमेरिका आणि युरोपचा पाय आर्थिक गर्तेत जातच राहील. यापेक्षा कमी अटींवर युक्रेन युद्ध संपणार नाही. रशियाच्या अपेक्षित हल्ल्याच्या भयापुढे पोलंडची गाळण उडाली आहे, कारण भले नाटो देश उद्या पोलंड बरोबर उभे राहतील, पण दुसऱ्या महायुद्धानंतर समृद्धीच्या सुखात लोळणारे युरोपियन देश पुन्हा उध्वस्त व्हायला तयार नाही. त्यामुळे नाटोचे नाव मोठं असलं तरी स्वतःचं रक्त सांडायला लागणारं साहस त्यांच्याकडे नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरण बारामती पुरस्कृत तर नाही ना ? असा संशय निर्माण होतो आहे. काल प्रवीण गायकवाड पवारांना भेटायला गेले तिथे भारत मुक्ती मोर्चाचा अध्यक्ष वामन मेश्राम सुद्धा उपस्थित होता. "शिवाजी महाराज औरंगजेब के मुसलमान मेहमान को गाय का मांस खिलाते थे", "शिवाजी बुजदिल था" असे संतापजनक वक्तव्य करणारा वामन मेश्राम आणि त्याला आपला गुरू मानणारा प्रवीण गायकवाड अश्या विकृती ह्या समाजात उजळमाथ्याने फिरू शकतात हे दुर्दैव आहे. स्वामी समर्थांना नागडा, गजानन महाराजांना गांजा पिणारा, प्रतापराव गुजराने एक मुलीवर बलात्कार केला अश्या प्रकारची वक्तव्य ही ब्रिगेडच्या लोकांकडून झाली आहे. त्यामुळे विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते ह्या ब्रिगेडच्या बाष्कळगप्पा आहेत. संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा ह्या संघटनांनी जी विकृती अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात निर्माण केली, आज त्यांच्यावर होणारे हल्ले आणि शाईफेक हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे प्रवीण गायकवाड , वामन मेश्राम सारख्या मंडळींनी लोकशाही , संविधान आणि विचारांची लढाई विचारांनी असे बोलणे हास्यास्पद आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
न्याययंत्रणा सामान्य नागरिकांच्या मनातून पूर्ण उतरत चालली आहे आणि त्यांचे वर्तन आता असहनीय सापेक्ष होऊ लागले आहे. उच्च न्यायालयामध्ये " उदयपूर फाइल्स" या चित्रपटाबद्दल युक्तिवाद चालू होता. चित्रपट निर्मात्याने न्यायमूर्तींना विनंती केली की त्यांनी स्वतः चित्रपट पाहावा आणि मग निर्णय घ्यावा. न्यायमूर्ती महोदयांनी त्यास नकार दिला आणि सांगितले की हा चित्रपट बंदी घालण्याची याचिका करणाऱ्यांना (कपिल सिबल आणि मंडळी) दाखवावा आणि चित्रपट प्रदर्शनास स्थगिती देण्याचा आदेश दिला. स्वतः चित्रपट न पाहता केवळ याचिकाकर्त्याच्या सांगण्यावरून स्थगितीचा आदेश देण्यात आला. कोणत्या सुबुद्ध माणसाला हा आदेश न्यायसंगत वाटेल? नैसर्गिक न्याय तत्त्वाच्या पूर्णपणे विरोधात असलेला हा तुघलकी आदेश आहे. बरं याबद्दल टीका केली तर लगेच न्यायालयाचा अपमान म्हणून शिक्षा होण्याची भीती आहे. यापूर्वी जेव्हा पिके या चित्रपटाविरुद्ध याचिका केली त्यावेळी न्यायालयाने चित्रपट आवडत नसेल तर पाहू नका ,असे म्हणत प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अशाप्रकारे दुतोंडी भूमिका घेत न्यायसनावर बसणाऱ्या अयोग्य व्यक्तींबाबत ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे. न्यायव्यवस्थेचे शुद्धीकरण आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
याआधी विधानभवनात सूर्यवंशी नावाच्या एका पोलिसाला जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आली होती तीही आमदारांकडून; त्याआधी एका आमदाराला आमदार निवासात दुसऱ्या बाईसोबत सापडल्याने चप्पलानी फटके देत त्याच्या बायकोने ओढत नेले होते; त्याही आधी रमेश वांजळेनी अबू आझमी शपथ घेताना त्याच्यासमोरचा डेस्क मोडून टाकला होता; या राड्यात मनसेचे १३ आमदार सामील होते. त्याच विधानभवनाच्या परिसरात एक राष्ट्रवादीचा आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मुजरा करत होता;त्या विधानभवनाच्या पायऱ्यावर अत्यंत खालच्या दर्जाच्या घोषणा दिल्या जातात; परवाच शिवसेनेच्या आमदाराने आमदार कॅन्टीनमध्ये एकाला तोंडावर बुक्की मारून खाली पाडले होते. त्यानंतर सभागृहात तंबाखू मळून तिचा तोबरा तोंडात भरताना काल परवा मंत्री महोदय सगळ्या महाराष्ट्राने बघितले. त्यामुळे विधानभावणात काल झालेल्या मारमारीचा निश्चितच निषेध करा पण महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या मंदिरात असे कसे घडले ही रड चुकीची आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्वीडनने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. स्वीडन ने पॅलेस्टिनींना शरण दिली आहे.गाझाहून पॅलेस्टिनींनी भरलेले विमान स्वीडनला पोहोचले. अशीच भरभरून विमाने स्वीडन ला जात आहेत. सध्या ते सर्वजण पाश्चात्य पोशाखात दिसत आहेत. स्वीडनला पोहोचल्यानंतर आणखीन विमाने भरून जातील, जेव्हा ते भरतील तेव्हा ते जाळीदार टोप्या घालतील आणि मशीद बांधतील आणि म्हणतील - "सभीका का खुन शामिल है इस मिट्टी में... किसीके बाप का स्वीडन थोडी है" इस्रायलने सध्या पॅलेस्टिनींच्या मनातून जिहादचा नशा उतरवला आहे. म्हणूनच ते पळून जाऊन काफिर ख्रिश्चनांचा देश असलेल्या स्वीडनला प्रदूषित करण्यास चालले आहेत. स्वीडनचे ख्रिश्चन त्यांना खाऊ घालतील, त्यांचे पालनपोषण करतील, त्यांना पैसे देतील, त्यांना घरे देतील, त्यांना डझनभर मुले जन्माला घालायला देतील. (महिला देखील तिथल्याच असतील) नंतर जिहाद करतील. मग लवकरच तेथील ख्रिश्चन अल्पसंख्याक होतील आणि आपल्याच देशातून पळून जातील.
🔽
#GeoPolitics #IndiaSpeaks #TruthUnfiltered #StrategicInsight #VoiceOfReason #AbhijeetRaneWrites #NationFirst #WakeUpCall #RealTalk #PowerPlay





Comments