top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 13
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भाजपा सरकार फक्त बोलत नाही तर कृतीतून आदर्श निर्माण करते आणि हे वारंवार सिद्ध होत असते. आज आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१,००० नेमणूक पत्रांचे वाटप देशभरातील ४७ ठिकाणी एकत्र येणाऱ्या तरुण तरुणींना ऑन लाइन पद्धतीने करणार आहेत. या सर्व नोकऱ्या केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या वेगवेगळ्या खात्यांत देशांतील विविध राज्यांत आहेत. या ५१,००० नोकऱ्यांसह आत्तापर्यंत झालेल्या सर्व म्हणजे १६ रोजगार मेळाव्यांत एकूण १० लाखांपेक्षा जास्त नोकऱ्यांची नेमणूक पत्रे देण्यात आली आहेत अशी माहिती केंद्र सरकार तर्फे देण्यात आली. कोंग्रेसचा दळभद्री राजपुत्र फक्त बडबड करत राहिला 2004 ते 2014 मध्ये त्यांच्याकडून किती जणांना असे नेमणूकपत्र दिले गेले हे एकही कोंग्रेसी कधीही सांगू शकणार नाही. या पूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या कोणत्या सरकारने या पेक्षा जास्त नोकऱ्या जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत,या बाबत काही आकडेवारी उपलब्धच नाही. त्याचे पहिले कारण म्हणजे पैसे घेतल्यशिवाय कुणालाही नेमणूक द्यायचीच नाही ही त्या काळातील आदर्श पद्धती होती आणि नोकर्‍या निर्माण करण्यासाठी लागणारे मोठे प्रकल्प आणि सक्षम अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टींचा कोंग्रेसी राजवटीत अभाव होता.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आठवड्याचा शेवट हा बर्‍यांच जणांसाठी आराम करण्याचा दिवस असतो ,परंतु आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे विकसित महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी शनिवारी सुद्धा तितकेच ताजेतवाने आणि कार्यरत राहून महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या प्रकल्पांचा आढावा घेत आहेत. सकाळी त्यांनी नवी मुंबई विमानतळाचा आढावा घेतला आणि आता पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्टचा आढावा घेऊन पुढच्या कामासाठी रवाना झालेले आहेत. मागच्या पाच दिवसात अधिवेशनात उपस्थित राहून जन सुरक्षा कायदा सारखा महत्त्वाचा कायदा मंजूर करून घेतला आणि प्रश्नांना उत्तर दिली. चर्चांना उत्तर दिली, विधेयक मांडले. अधिवेशन कालावधी झाल्यानंतर अनेक कार्यक्रम अटेंड केले. मिटिंग अटेंड केल्या आणि शनिवारी पुन्हा पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. त्यांचे आदर्श मोदीजींच्या प्रमाणे देवेंद्रजी सुद्धा कोणतीही सुट्टी न घेता महाराष्ट्रासाठी झटत आहेत. घरबष्या मुख्यमंत्र्यामुळे महाराष्ट्राने अडीच वर्षात खूप काही गमावलं असलं तरी देवा भाऊंच्या नेतृत्वात पाच वर्षात त्याची कमी पूर्णपणे भरून काढली जाणार आहे आणि महाराष्ट्र नक्कीच वन ट्रिलियन इकॉनोमी होईल यात कोणतीही शंका नाही

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आज सर्वाधिक घृणीत व्यवसाय पत्रकारिता हाच आहे आणि याला जबाबदार समस्त पत्रकार मंडळीच आहेत. सेक्युलर पत्रकार या शब्दाची व्याख्या राष्ट्र विरोधी विचारांचे पालन करणारा , जनसामान्यांच्या मताला पायदळी तुडवणारा , मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा व्यक्ति अशीच आहे. या समस्त भांगेत एक तुळशीचे रोपटे उमलले आहे ते म्हणजे पांचजन्य या वृत्तपत्राचे निर्भय पत्रकार शिवम दीक्षित. या तरुण पत्रकाराने मौलाना चांगुर याचे धर्मांतर रॅकेट उघड करून दाखवले आहे. परदेशी निधी, स्थानिक नेटवर्क, राजकारणी मंडळींचा आशीर्वाद आणि मीडियाचे संरक्षण या बळावर मौलाना चांगुर हिंदू मुलींना नरकात ढकलण्याचे कार्य करत होता आणि तळहातावर प्राण घेऊन शिवम दिक्षित या संघटित गुन्हेगारांशी एकट्याने लढत होता. लेखणी या शस्त्राचा इतका उत्तम वापर गेल्या कित्येक दशकात झालेला नाही तो शिवम दिक्षित यांनी करून दाखवला आहे. शिवमने २०२२ पासून आतापर्यंत मियां चांगूरच्या दुष्कृत्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. पण त्याच्या रिपोर्टिंगला बनावट बातम्या असे संबोधून बदनाम केले गेले. पण अखेरीस सत्याचा विजय झाला. आज जेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी चांगूर मोलवीच्या बेकायदेशीर मालमत्ता बुलडोझरने पाडल्या, तेव्हा ती केवळ प्रशासकीय कारवाई नव्हती तर तो एका ध्येयनिष्ठ पत्रकाराच्या लढ्याचा यशस्वी शेवट होता. शिवम दीक्षित तो एक निर्भय आणि प्रामाणिक पत्रकार असण्यासोबतच ते एक खरे सनातनी आणि हिंदुत्वाचे सैनिक आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

असाच न्याय प्रत्येक आरोपीसोबत व्हायला हवा.आसाममधील बोंगाईगाव येथील १९ वर्षीय मजूर अरुणाचल प्रदेशात काम करण्यासाठी गेला होता.. तो दिबांग व्हॅलीमधील रोइंग येथे भाड्याने राहत होता. माउंट कार्मेल शाळेजवळच एक वसतिगृह होते, ज्यामध्ये अनेक छोट्या मुली राहत होत्या. एक दिवस या मजुराने वसतिगृहात घुसून पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पण मुलगी तिच्या कुटुंबाला काहीही सांगण्याइतकी सज्ञान नव्हती.सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याने आरोपीला हा खेळ सुरक्षित वाटला...तसेच आणखी एक मोठे कारण म्हणजे या परिसरात अशा घटना घडण्याची शक्यता नगण्य होती. त्यामुळे यानंतरही हा नराधम आरोपी अनेक वेळा वसतिगृहात चोलून जात राहीला आणि त्याने ६ ते ९ वर्षे वयोगटातील डझनभर मुलींवर बलात्कार केला...शेवटी एका छोट्या मुलीने तिच्या कुटुंबाला या लैंगिक छळाबद्दल सांगितले.तिच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचा तपास केला आणि वैद्यकीय तपासणीत वसतिगृहातील ७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली. ११ जुलै रोजी पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलिस ठाण्यात ठेवलेच होते की दुपारी अडीचच्या सुमारास पोलिस ठाण्याबाहेर गर्दी जमू लागली आणि जमावाने आरोपीला तुरुंगातून बाहेर काढुन त्याला जबर मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला. आरोपीचे नाव अर्थातच रियाज उल कुरेम होते. ही विकृती ठेचून नष्ट करणे आवश्यक आहे. कायद्याने यांना शिक्षा होत नाही हे आता सगळ्यांनाच माहिती झाले आहे.

🔽

ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page