🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 9
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मराठी अस्मितेच्या आंदोलनाचे काही साईड इफेक्ट आहेत जे कोणीच ध्यानात घेत नाही. उत्तर भारतीय हिंदू फेरीवाले बहुधा गरीब, अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे आणि स्थानिक राजकीय पाठबळाशिवाय असतात. त्यामुळे, जेव्हा त्यांच्यावर राजसेना किंवा उद्धवसेना सारख्या गटांकडून हल्ले किंवा दहशत निर्माण केली जाते, तेव्हा ते त्या भागातून पळ काढतात. अशा महत्वाच्या ठिकाणी एक व्हॅक्यूम निर्माण होते. मुस्लिमांचे गट अनेकदा व्यवस्थित संघटित असतात. जेव्हा एखादी जागा मोकळी होते, तेव्हा त्यांच्या संघटनांमधून लगेचच 'आपल्या लोकांना' त्या जागेत बसवले जाते. राजसेना आणि उद्धवसेना आजवर कधीच त्यांच्या वाटेला गेलेल्या नाहीत. त्यांच्या संघटनांमार्फत मग ते हिंदू फेरीवाल्यांवर दादागिरी करणाऱ्या स्थानिक राजसेना व उद्धवसेनेच्या लोकांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना हफ्ता देतात आणि आपली जागा सुरक्षित करतात. परिणामी, रिकाम्या जागांचे पद्धतशीर स्वरूपात ताब्यात घेणे घडते.मुंबईत गेल्या 20 वर्षांत फेरीविक्रीच्या व्यवसायात मोठा बदल दिसतो. आधी या ठिकाणी मुंबईतील मराठी, महाराष्ट्रातील इतर भागातील मराठी, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड येथील हिंदू व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते, पण आता तिथे मालदा व मुर्शीदाबादच्या बंगाली मुस्लिमांचा 'अंमल' दिसतो. त्यामुळे या आंदोलनांचे खरे कारण काय ? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या माझे ऐकले नाही, तर टेरिफ वाढवणार. या धमकीला सुरूवातीला संपूर्ण जगाने गांभीर्याने घेतले परंतु एक शस्त्र वारंवार वापरले की ते बोथट होऊन जाते या नियमाला अनुसरून आता जगभरातील देशांनी ट्रंप यांना घाबरणे सोडून दिले आहे. अमेरिकन डॉलरचे आंतरराष्ट्रीय व्यापारात असलेले जाचक महत्त्व कमी करण्यासाठी ब्रिक्स संघटनेत असलेल्या देशांनी त्यांच्या आपापसातील व्यवहारांची देणी-घेणी मिटवण्यासाठी दोन्ही देशांना महागड्या ठरणाऱ्या अमेरिकन डॉलरचा आर्थिक माध्यम म्हणून वापर न करता अन्य पर्यायांचा विचार करण्यात काहीही गैर नाही. त्यांचा तो सार्वभौम अधिकार नाकारण्याचा प्रयास चुकीचाच आहे. ब्रिक्स देशांनी स्वतःसाठी डॉलर या माध्यमाखेरीज अन्य कोणत्याही माध्यमाचा विचार करता कामा नये अशी बळजोरी अमेरिकेचे अध्यक्ष कोणत्या अधिकारात करू शकतात? ट्रम्प यांचे हे वागणे चिनी मातीच्या वस्तूंच्या दुकानात शिरलेल्या बैलासारखे आहे.हा बैल त्याच्या शिंगांनी, खुरांनी आणि शेपटीने चिनी मातीच्या बनलेल्या सर्व वस्तूंची तोडफोड करणारच. ट्रम्प यांची ही दादागिरी फार काळ चालणार नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आमदार निवास ही वास्तु आमदारांच्या रहाण्यासाठी आणि त्यांच्या खेडोपाड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांसाठीचा निवारा आहे. आमदार रहात असल्याने इथे चांगल्या दर्जाच्या सुविधा रास्त मुल्यात दिल्या जातात अशी एक भावना असते. परंतु आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासातील कॅंटीन मधून चक्क विटलेले अन्न खाण्यासाठी त्यांच्या खोलीत पाठवले गेले. आमदारांनी कॅंटीन मध्ये जाऊन चौकशी केली असता एकंदरच अन्नाचा दर्जा अत्यंत खलवलेला असल्याचे उघड झाले आहे. विटलेले अन्न खाऊन लोकांना अन्नातून विषबाधा सुद्धा होऊ शकते. आमदार निवासातील कॅंटीनच्या अन्नाचे सुद्धा जर अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासले जात नसेल तर संपूर्ण राज्यातील हॉटेल्स मध्ये खायला घातल्या जाणार्या अन्नाच्या दर्जाचे काय ??? महाराष्ट्रातील सगळीच सरकारी खाती निष्क्रिय झालेली असून त्यांच्यावर कुणाचाच वचक उरलेला नाही हेच खरे आहे. आमदार संजय गायकवाड यांनी हे प्रकरण मी विधानसभेत मांडणार असल्याचे घोषित केले आहे परंतु ही कारवाई केवळ आमदार निवास कॅंटीन पुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर अश्या पद्धतीने कारवाई केली गेली पाहिजे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
छांगुर बाबा (जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबा) हा उत्तर प्रदेशच्या बलरामपुर जिल्ह्यातील अवैध धर्मांतरण रॅकेटचा प्रमुख. हा मुस्लिम तरुणांनी हिंदू तरुणींना प्रेमजाळात अडकवून इस्लाममध्ये धर्मांतरीत करावे यासाठीची मोहीम अर्थात लव्ह जिहाद षडयंत्र चालवत होता. त्याच्या निवासस्थानी धाड टाकल्यावर त्याच्याकडे 100 कोटी रुपये रोख आढळून आले आणि 30-40 कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात असल्याचे उघड झाले आहे. या बाबाने हिंदू धर्मातील मुलींचे जातीनिहाय दर ठरवले होते. जो मुस्लिम तरुण ज्या जातीच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकावेल त्याला त्यानुसार पैसे दिले जात होते. हा जिहादी छांगुर बाबा “जिसकी जाती भारी ऊसकी ऊतनी किंमत भारी” अगदी उच्च जाती, ओबीसी, एस सी यांना ८ लाख ते १५ लाख रेट लावून घाऊक बाजारात, एजंट नेमून एजंटाना २० % कमिशन देऊन धर्मांतर करवत होता फसवणूक करून अल्पवयीन मुलीचे निकाह लावून देत होता. हा प्रकार महाराष्ट्रासह संपूर्ण देशात षडयंत्र स्वरुपात सुरू आहे हे हिंदुत्ववादी संघटना वारंवार सांगत होत्या पण त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. आता तरी महाराष्ट्र शासन लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदा करणार आहे का ?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काल राज ठाकरे यांनी एक फर्मान जारी केले आहे आणि त्यानुसार पक्षातील कोणीही मिडियाशी संवाद साधायचा नाही. अगदी स्वतःचे वैयक्तिक मत व्यक्त करण्यासाठी सुद्धा व्हिडिओ करायचा नाही. थोडक्यात आता मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांनी सांगेपर्यंत मौन व्रत धारण करायचे. परंतु राज ठाकरे इतके का भडकले?? कारण संदीप देशपांडे,गजानन काळे,अविनाश जाधव हे तिघेही मिडीया अटेंशनसाठी हपापलेले असतात. मनसेचे प्रवक्ते असूनही अविनाश जाधव किंवा संदीप देशपांडेला कशाप्रकारे बोलावे,याचे काडीचेही भान नसते. त्यामुळे आता त्यांचे पंख छाटले जाऊन मनसे तर्फे आता फक्त नितीन सरदेसाई,बाळा नांदगावकर यांनाच परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील अनेक केंद्रीय कर्मचारी, बॅंक कर्मचारी, मल्टी नॅशनल कंपन्यांमधले कर्मचारी बदल्या होवून इतर राज्यांमध्ये जातात, त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होवू शकतो. ज्या पद्धतींने सध्या मराठी अस्मितेचे आंदोलन सुरू आहे , ते कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते याची राज ठाकरे यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांना फर्मान काढावे लागले आहे.
🔽












Comments