🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 7
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्वामी रामभद्राचार्य नावाचे एक संस्कृत साहित्याचे विद्वान असे संन्यासी आहेत.अयोध्या राम मंदिर खटल्याचा निकाल हिंदुंच्या बाजूने लागण्यात या स्वामींची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली होती. ७५ वर्षांच्या या विद्वान,अंध संन्यासी महाराजांनी सर्व हिंदुंना आवाहन केले आहे की जे हिंदुंच्या हिताविरोधात काम करणारे राजकीय पक्ष आहेत त्यांना हिंदुंनी मतदान करू नये. हे आवाहन त्यांनी नजिकच्या काळात होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकी संबंधात केले असावे.परंतु ते नजिकच्या काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच नगर पंचायती,नगर परिषदा, महापालिका आणि महानगर पालिका या स्तरावरील निवडणुकांना सुद्धा तितकेच लागू आहे. मतदार राजा,जागा रहा आणि जे जे राजकीय पक्ष हिंदु हितविरोधी वर्तन करत आहेत असे तुला वाटते त्यांना तू जाणीवपूर्वक तुझे बहुमूल्य मत देऊ नकोस.या पक्षांपैकी एक पक्ष सध्या भाषेच्या आडून स्वतःचे राजकीय पुनरुत्थान करू पाहत आहे.परंतु तो पक्ष हिंदु विरोधी आचार विचार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या गटातील च आहे. हे जर तुला दिसत असेल तर त्याच्या उमेदवारांना सुद्धा तू तुझे मत देऊ नकोस.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संपूर्ण काँग्रेस पक्षाकडून सुद्धा देशाला धोका असल्याची खात्री वाटू लागली आहे. काँग्रेस हाय कमांडच्या मध्यस्थीने सत्ता संपादनाची रस्सीखेच तात्पुरती थांबली असे वाटले तरी कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्री पद स्वतःकडे राखण्याची आणि ते स्वतःकडे खेचून घेण्याची चढाओढ अजून ही चालूच आहे.सिद्धरामय्या सरकारवर काँग्रेसच्याच आमदारांची अशी जाहीर नकारात्मक शेरेबाजी हे च दर्शविते की कर्नाटक काँग्रेस मधील अंतर्गत लाथाळी अजून थांबलेली नाही. देशात सध्या फक्त तीन राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत.हिमाचल प्रदेश,तेलंगणा आणि कर्नाटक.त्यातील कर्नाटक राज्य सर्वात मोठे.त्याच्या अर्थव्यवस्थेची राहुल गांधी ची खटाखट आश्वासने पुरी करण्यात पुरी दमछाक झाली आहे.तेलंगणाचा मुख्यमंत्री जनतेला दमबाजी करत आहे आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगत आहे की इंदिरा गांधींवर टीका करणाऱ्यांची वस्त्रे उतरवा आणि त्यांना मारहाण करा.हिमाचल प्रदेश ची गाडी अशी रडतखडत चालली आहे की मध्यंतरी हिमाचल प्रदेश सरकार कडे सरकारी नोकरांना पगार आणि पेन्शन देण्यास सुद्धा पैसे नव्हते. यांना तीन राज्ये धड चालवता येत नाहीत आणि महत्त्वाकांक्षा मात्र देशाची सत्ता काबीज करण्याची.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्टॅलिन हे वरवर हिंदीविरोधी दिसत असले तरी त्यांचा कुळ हिंदुद्रोही आहे. पेरियारने हे बीज रोवलं होतं. जातीयवाद आणि हिंदूविरोध हा त्यांच्या राजकारणाचा महत्वाचा पैलू आहे. भाषावाद ही केवळ फोडणी आहे, तिथल्या जनतेला मूर्ख बनवायची. आता या हिंदुद्रोही लोकांनी ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. म्हणजेच ठाकरे कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत हे लक्षात येतं.राजू, वागळे सारखे लबाड लोक जे बाळासाहेबांना दूषणे द्यायचे ते जेव्हा उध्दवजींची बाजू उचलून धरतात, तेव्हा उद्धवजी कोणत्या मार्गावर आहेत याचा प्रत्यय येतो. आता स्टॅलिनसारखा दुष्ट माणूस बोलतोय म्हणजेच दया सबकुछ गडबड है. उद्या जर दोन्ही ठाकरे एकत्र येऊन लढले तर मुसलमान समाज काँग्रेसला मतदान करणार नाही, तर ठाकरेंना करेल. मुसलमानांच्या मतावर ठाकरे निवडून आले तर ते कुणासाठी राबतील हे सांगण्याची गरज नाही. भाषिक राजकारणाला फशी पडून ठाकरेंना मत देणार्या मराठी हिंदू जनतेने अजून एकदा पाठीत खंजीर खुपसून घ्यायला तयार रहावे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“ये पब्लिक है ये सब जानती है.” प्रियांका चतुर्वेदी एप्रिल 2019 ला उबाठा गटाची सभासद होऊन उभाठा गटातर्फे राज्यसभेची खासदार झाल्या. प्रियांका गेली 46 वर्ष मुंबईत राहूनही काल वरळी ला हिंदीत पत्रकारांना मुलाखत देत होत्या, तेव्हा कोणी कानाखाली नाही मारली. तुमचा स्वतःचा खासदार मुंबईत 46 वर्ष राहूनही मराठीत बोलत नाही आणि तुम्ही दुसऱ्याला शिकवणार ? उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र मधील करोडो मराठी माणसातून कोणताही मराठी माणूस योग्य वाटला नाही म्हणून परप्रांतीय प्रियांका चतुरवेदी यांना राज्यसभेची सीट दिली. ह्या अगोदर पण तुम्ही धूत, चंद्रिका केनिया यांना खासदार बनवले होते.हा दुपट्टी पण सोडा. सुरवात स्वतःच्या घरापासून करा, नंतर घराबाहेर येऊन शेजाऱयांना सांगा. तुमचे मराठी प्रेम फक्त सोन्याची अंडी देणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या तिजोरी साठी आहे हे मुंबईतील उरलेला मराठी माणूस जाणून आहे. आणि म्हणूनच त्या मराठी माणसाने राज ठाकरे यांचे सुपुत्र, अमित ठाकरे यांना मराठी मतदार संघातून असे पाडले की तो तिसरा आला. आणि आदित्य वरळी मध्ये पडता पडता वाचला. त्यामुळे मनोमिलन फार्स करून फार काही हाती लागेल असा भ्रम बाळगू नका.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
संजय राऊत हेच खरे अनाजी पंत !!! अण्णाजी दत्तो (अनाजी पंत) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मंत्री होते. मलिक अंबर ने तयार केलेल्या कर रचनेला बदलून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर रचना अमलात आणली व छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जायचे. महाराजांच्या निधनानंतर भोसले कुटुंबात सुरू झालेल्या यादवीत अण्णाजी दत्तो यांनी महाराणी सोयराबाई यांची साथ दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध कट रचण्यात अण्णाजी दत्तो महाराणी सोयराबाईंसोबत होते त्याची शिक्षा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो व इतरांना मृत्यू दंडाची शिक्षा दिली. आता श्री उद्धव ठाकरे लोकांना अनाजी पंत म्हणून हिणवतात पण पहिल्या पिढीशी प्रामाणिक राहून दुसऱ्या पिढीशी द्रोह करणे ही वृत्ती म्हणजे अनाजी पंत असे जर मानले तर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिले पण पुढच्या पिढीला आलमगीर दावणीला नेऊन बांधले ते संजय राऊतच खरे अनाजी पंत ठरतात. हे त्यांना आणि राऊतांना मान्य आहे का ?
🔽












Comments