*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:चे राजकीय वजन दिल्ली दरबारी खर्ची केले.तेव्हा केंद्रीय भाजप नेतृत्वाने हिरवा कंदील दिला.अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा ह्यांची मान्यता मिळणे कठीण होते.
www.abhijeetrane.in

*ABHIJEET RANE (AR)*
माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या दोन मुली टिईटी घोटाळ्यात सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी विरोधकांची मागणी आहे.परंतु त्यामुळे सत्तार डगमगले नाहीत. त्यांनी कुटुंबातील कोणी गैर केले असल्यास त्यांचेवर कारवाई होईल असे धाडसाने सांगितले.
www.abhijeetrane.in
*ABHIJEET RANE (AR)*
संजय राऊतांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्याने पुढील तीन दिवस कैद्यांचे हुक्कापाणी बंद राहील. मग काही कैदी त्यांना भेटून विचारतील किंवा बंदोबस्तावरील शिपायांपैकी कोणी राऊतांच्या कानी लागेल मग कैद्यांच्या चोरमार्गी सुविधा पूर्ववत होतील.
www.abhijeetrane.in

*ABHIJEET RANE (AR)*
संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांना जामीन मिळण्याची शक्यता कमीच.ईडीच्या आरोपींबाबत न्यायालयीन कामकाज पध्दतीतले नियम त्याला कारणीभूत आहेत.त्यांमुळे राऊतांना संघर्ष करावा लागेल. त्यांच्या नशिबातील तो भोग चुकणारा नाही.
www.abhijeetrane.in
Kommentare