top of page
dhadakkamgarunion0

desk of Shri. Abhijeet Rane

*@ABHIJEETRANE(AR)*

मिडीयामध्ये आज काल 1975 च्या आणीबाणीच्या आठवणी काढणे चालू आहे आणि उद्धवठाकरे म्हणतात "केंद्र सरकारने आणीबाणी लादली आहे तर देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचा आरोप केला आहे. तुम्हाला काय वाटते? मला दोन्ही पैकी कुठल्याही सरकारने आणीबाणी लादली आहे असे वाटत नाही. इतपत सूडबुद्धी आणि तणातणी कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात किंवा राज्यांत असले तरी कायम असतेच आणि एकमेकांवर आणीबाणी लादल्याचे आरोपही होत असतात. खरे की नाही?


 

*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्रात प्रत्येक विकास प्रकल्पाला कोणती ना कोणती स्थानिक संघटना किंवा राजकीय पक्ष अटीतटीचा विरोध आणि आंदोलन करून तो प्रकल्प रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो हा आजवरचा इतिहास आहे. प्रशासकीय अधिकारी अडथळे निर्माण करण्यात धन्यता मानतात तर सत्ताधारी तोडबाजी आणि विरोधक तोडफोड करण्यात पुढे असतात. मी भारतातील अनेक राज्यांत जातो तिथे तिकडले उद्योगपती भेटतात किंवा तिकडले इकडे येतात तेव्हा भेटतात. सर्वजण स्वानुभव सांगतात की "महाराष्ट्रा इतके उद्योग धंदे व्यापार व्यवसाय करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचे दुसरे राज्य देशात नाही. कायदे कडक त्यामुळे भ्रष्टाचार अधिक. अधिकारी आणि कर्मचारी यांची राजकीय नेत्यांशी भागीदारी असल्याने एक मोठी साखळी सांभाळावी लागते. स्थानिक दादा भाई डाॅन नगरसेवक शाखा प्रमुख भूमीपुत्र संघटना यांना काँट्रॅक्ट किंवा टक्केवारी द्यावीच लागते. स्थानिक कामगार पगार घेतो असे समजून काम न करता पेन्शन घेतल्यासारखे आळशीपणा करून दांड्या मारतात. वीज, जमीन, कर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच महाग आहे. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश मध्ये उद्योगपती आणि उद्योजकांना संधी सुविधा सवलत सुरक्षितता महाराष्ट्राच्या तुलनेत खूप जास्त आहे. हे सर्व ऐकताना दुर्दैवाने मी असे म्हणू शकलो नाही की "हे खोटे आहे". उलट हे सगळे इतके खरे आहे की मला माझ्या राज्यातील या दुरावस्थेची लाज वाटली. माझ्या सारख्याची जर ही अशी गोची होत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री कोणत्या तोंडाने इतर राज्यांतील किंवा देशातील उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करणार??


4 views0 comments

Kommentare


bottom of page