*ABHIJEET RANE (AR)*
राजस्थानातून दोन पाकिस्तानच्या आयएसआय एजंटांना पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून बाकीच्या त्यांच्या साथीदारांची माहिती पोलिसांना मिळेल.परंतु त्याद्वारे गुप्तचर यंत्रणा मु़बई व जवळच्या परिसरांतील त्यांचे साथीदार शोधणार कधी?ही कारवाई तर झटपट व्हायला हवी
◆
*ABHIJEET RANE (AR)*
उद्योगपती मुकेश अंबानींना पुन्हा धमकी देण्यात आली.पोलिसांनी गुन्हा नोंदवला.बडी आसामी असल्याने सर्वच सुरक्षा यंत्रणा चौकशी करतील.पण देशाच्या विकासांत सहभागी होणाऱ्या बड्या असामींना अशा धमक्या दिल्या जातात ह्या मुद्याची नोंद पोलिस घेणार का?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मेट्रोकरिता होणारी आरेतील वृक्षतोड थांबविण्याकरिता पर्यावरण प्रेमी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपर्यंत पोचलेत.राष्ट्रपतीं तक्रार दाखल करून घेत कारवाईसाठी पुढे पाठवतील.परंतु मुंबईत स्टे मिळेपर्यंत मेट्रोचे काम ७० टक्के झाले असेल.मग ह्या द्रविडी प्राणायमचा काय उपयोग?
◆
*ABHIJEET RANE (AR)*
न्यायव्यवस्था संविधानप्रती बांधीलकी जपते असे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णां म्हणाले.परंतु न्यायालयातील खाजगी दावे,खोटी पिटीशन्स पाहता कोर्ट कोणतेही असोत वकील त्यांच्या अशिलांची खोटी कागदपत्रे कोर्टाच्या आदेशाने सरकार दरबारी खपवण्याच्या प्रयत्नात असतांत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पॉवरफुल हा जो भ्रम मिडीया तयार करते त्याचा कधीतरी भुगा होणार आहे.शिंदेंंनी शिवसेना हायजॅक करून मुख्यमंत्रीपदी मिळवले.त्याकरिता त्यांनी किती मोठी किंमत मोजली असेल? याबाबत विचारतरी व्हावा.
Comments