top of page

desk of abhijeet rane

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

सद्या शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे किंवा मातोश्रीरूध्द आरोप करण्याचे पेव फुटले आहे. आमदार, खासदार पदाधिकारी पक्ष नेतृत्वावर टिका करण्याचे काम करत पक्षाने हकालपट्टी करावी असे वर्तन करीत आहेत. तेच काम रामदास कदमांनी केल ह्याचे आश्चर्य वाटत नाही.

 

*ABHIJEET RANE (AR)*

रामदास कदम ह्यांनी शिवसेनेत खस्ता खाल्ल्या पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना विसर पडला असावा आणि त्यांनी वारंवार मातोश्रीवर थेट आरोप न करता मातोश्रीत वावरणाऱ्या अनिल परबांना सातत्याने लक्ष्य केलं आणि कट मातोश्रीत शिजला असा़ आरोप केला.

 

*ABHIJEET RANE (AR)*

रामदास कदमांना हकालपट्टी होण्याआधी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी विचारले नाही ह्याबद्दल अतोनांत दुख: झाले. सहाजिकच आहे. नारायण राणेंशी दोन हात करणाऱ्या कदमांना ते होणारच होते. परंतु एकनाथ शिंदें बंडात पक्षनेतृत्वाचेही काही समज-गैरसमज केले गेले असणारच ना?

 

*ABHIJEET RANE (AR)*

भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांना अज्ञाताने ठगवले.सदैव मदतीत तत्पर असणाऱ्या या चौघींनी गरिबाला आईच्या आजारांत मदत होईल या हेतूने पैसे दिले परंतु पुण्यात अजूनही भामटे आहेत हेच त्यांना अनुभवायला मिळाले.

 

*ABHIJEET RANE (AR)*

राहुल शेवाळेंनी खासदारांचा गट बनवला.आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत थेट उध्दव ठाकरेंवरच निशाणा साधला.त्यांच्या ह्या बंडाची दखलं ठाकरेंनी घेतली नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे शेवाळेंच्याही बंडाला बळ मिळाले.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मुंबई महानगरपालिकेचा आर साऊथ विभाग हा गुंड, दलाल, स्वयंघोषित नेते,खंडणी उकळणाऱ्या आरटीआय ॲक्टिव्हिस्टनी भरला होताच परंतु गृहनिर्माण सोसायट्यांत फसवणूक करणाऱ्या काही महिलांचाही पाईक बनला आहे. खोट्या तक्रारींवर इथे रिपोर्ट मिळतांत म्हणे.

 
 
 

Recent Posts

See All

🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात तुम्ही जे पेरता तेच उगवते हा जगाचा नियम आहे. भारतात गेली कित्येक वर्ष दहशतवाद पोसणारा पाकिस्तान आता त्याच आगीची...

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page