*ABHIJEET RANE (AR)*
मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस कार्यपध्दतीचे मार्गदर्शन करणार असल्याने पोलिसांत हुरूप वाढलायं. पोलिस ठाण्यांत नागरिकांच्या तक्रारींचे निरसन होणे जसे गरजेचे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांची घुसमट वरिष्ठांना समजणेही तितकेच महत्वाचे.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
राज्यात गुरूपोर्णिमा श्रध्दापूर्वक पार पडली. समाजमाध्यमांतूनही बडे राजकीय नेते त्यांच्या राजकीय गुरूंचे स्मरण करताना सोबत ते गुरूपदेशही करत होते.ते पाहता त्यांना खोटे बोलायला शिकवणारा महागुरू कोण हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यावाचून राहिला नाही.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरेंचे मनोमिलन होऊन मविआ फूटू नये ह्यासाठी राष्ट्रवादी अतिसावधानता बाळगत आहेत.म्हणूनच उध्दव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवरती येईल असे बिनबुडाचे विधान जयंत पाटीलांनी केल्याचे मानले जाते.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
एकनाथ शिंदें समर्थक दिपक केसरकर व निलेश राणे ह्या़च्यांत कलगीतुरा रंगतोय. ते पाहून ठरवलेले संवाद नाट्य ते रंगवताहेत की त्यांच्यातील असलेले टोकाचे मतभेद जपण्याची काळजी दोघेही घेताहेत अशी शंका मनी आल्याशिवाय राहात नाही.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे शरद पवार ह्यांनी जाहीर केले. तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वसामान्यांपर्यंत पोचलेत कुठे?राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शहरातील सोसायट्यांच्या घपल्यातील चौकशा दबवायच्या धडपडीत दिसतांत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना सरकार व पोलिस अधिकार प्रदान करत सुटलयं. परंतु सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचे घपले वाढलेत त्यांच्यावर त्वरेने कारवाई व्हावी ह्याकरिता शासन किंवा प्रशासन दोघेही लक्ष देत नाहीत.मग होणार काय? तळे राखी तो पाणी चाखी...
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुंबई मनपा निवडणुका जाहीर व्हायला अवधी आहे. परंतु त्या ताबडतोब कराव्यात ह्यासाठी मनपा प्रशासकांपासून निवडणूक आयोगापर्यंत राजकीय दबाव वाढलायं.मग निवडणुकांकरिता लागणारे मनु्ष्यबळ व अन्य सुविधा राजकीय नेतेमंडळी पुरविणार आहेत का?
Comentários