top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

सत्ता हातून निसटतानाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्यातील कणखरपणा अजूनही टिकून आहे म्हणायचा तसे नसते तर त्यांनी पाच बंडखोर मंत्री व चार राज्यमंत्र्याकडील कारभार काढला नसता.जनहितार्थ का होईना मुख्यमंत्र्यांना ही कृती करावीशी वाटली हेही थोडके नसे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर आमदारांच्या खर्चाबाबत ओरड सुरू आहे.भाजप,आसाम सरकार तर कोणी काळा बाजारवाला पैसा खर्च करतो का? असा सवाल विचारला जातो आहे.तरीही उघड झाले नाही. बंडखोर दिपक केसरकरांनी प्रत्येक आमदार स्वत:चा खर्च करतो असा दावा केला आहे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

सुधीर मुनगंटीवारांनी पत्रकारांना भाजप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेतअसे सांगितले. त्यानंतर लगेच भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलाविले. मविआ अल्पमतांत आली म्हणून तातडीने बहुमत सिध्द करावे अशी मागणी पक्षाचे आमदार ठरावांत करणार का?

 

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसैनिकांच्या रोषामुळे गुवाहटीतील बंडखोर आमदार मुंबईत यायला तयार नाहीत तर नाराज बंडखोरांचे बंड मोडायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नॉट रिचेबल व्हायला तयार नाहीत. मग ह्यातून तिढा निघणार तरी कसा? की कॉर्पोरेशन इलेक्शनपर्यंत हे असेच चालणार?

 

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर आमदार नक्की कोणाकडे जाणार? हा प्रश्न गुलदस्त्याच.स्वतंत्र गट,भाजपा, प्रहार संघटना आदि पर्याय संपले म्हणून शेवटी मनसेत समाजमाध्यमे विलीन करायला निघाली. त्यामुळे फुललेल्या मनसे नेते बाळा नांदगांवकरांनी तुर्तास तरी तसा प्रस्ताव आला नसल्याचा खुलासा केला.

 

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेत आता कोणीही प्रमुख नेतेमंडळींना टपल्या मारायला लागलयं.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी मवाळ भूमिका घेतल्यामुळे तसे होत आहे.अन्यथा मृदुवाणीच्या दिपक केसरकरांनी थेट त्यांच्यावर कडवट टिका केली नसती.

 

3 views0 comments

Comments


bottom of page