top of page
  • dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

*ABHIJEET RANE (AR)*

आमदार अपात्रतेबाबतचा निकाल सोमवारपर्यंत लांबला. इतके दिवस वकीली युक्तीवदांत उध्दव ठाकरेंच्या बाजूने असलेले हे प्रकरण न्यायालयीन पातळीवर समान स्तरावरं उभे असल्याचे वाटले. त्यामुळे निकाल कोणाच्या पारड्यात पडतोय.ह्यविषयीची उत्सुकता कायम आहे.


*ABHIJEET RANE (AR)*

भाजपमुळे अपात्र आमदारांचा निकाल शिवसेनेच्याविरूध्द लागणार अशी आवई उठल्याने शिवसेना घाबरली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे बजावल्याने शिवसैनिकांत आनंदाच्या उकळ्या फुटल्या.

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेच्या अरविंद सावतांनी शिंदे गटाचे वकील कोर्टात लॉजिक मा़ंडत होते अशी खिल्ली उडवली.परंतु त्यामुळेच अनुभवी वकील कपिल सिब्बल हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर शिंदे गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धावला हे कोर्टाच्या निदर्शनास आणायला विसरले.

 

*ABHIJEET RANE (AR)*

सर्व्वोच्च न्यायालयाचा निर्णय सोमवारपर्यंत लांबल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पुढे ढकलला गेल्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु शिंदे गटाचे दिपक केसरकर मिडीयाला रविवारीच विस्तार होण्याची ग्वाही देत राहिले हे विशेष.


*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर उदय सामंताच्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरेंकडे शिंदे गटाने बोट दाखवले परंतु मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान असूनही त्यांचे पोलिस ठाकरेंपर्यंत चौकशीकरिता का पोहोचत नाहीत? हा प्रश्न सुटत नाही.

*ABHIJEET RANE (AR)*

घर घर तिरंगा, हर घर तिरंगा ही केद्र सरकारची घोषणा मुंबईत अंमलांत आणण्यासाठी राज्य सरकारबरोबर मुंबई मनपाने उडी घेतली. मनपाच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांवर ही मदार सोपविली असून प्रत्येक विभागात त्यांचेमार्फत तिरंगा पोहचविला जाणार आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहचल्याच्या रंगतदार बातम्या समाजमाध्यमांत दुपारी पेरल्या गेल्या. परंतु त्याबाबत संध्याकाळी गंधवार्ताही नव्हती.त्यामुळे शिंदेसेना-भाजप सरकारसाठी नव्हे तर फक्त सनसनाटी पसरविणासाठीच हे वृत्त असा अर्थ काढला गेला.

*ABHIJEET RANE (AR)*

वर्षा राऊतांना ईडिने बोलाविल्याने राऊतांच्या मागची ईडीची पिडा टळत नाही. राऊत ईडीच्या अटकेत पत्नीचीही चौकशी त्यामुळे ईडी कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.पण पत्राचाळ प्रकरणीचे सत्य शोधण्याकरिता ईडीला त्याकडे दुर्लक्ष करत काम करणे भाग आहे.

2 views0 comments

Comentários


bottom of page