🖋️ अभिजीत राणे लिखित
दै. मुंबई मित्र
वि श्ले ष ण रा ज का र णा चे
=====
बाळासाहेबांच्या वेदना
किती दुर्दैवी बाब, निर्लज्जपणा चा कळस आहे की केवळ स्वतच्या राजकीय स्वार्था करिता व खुर्ची करिता मत घेण्यासाठी साठी,
प्रभू श्रीराम मंदिराच्या आंदोलनामध्ये अयोध्येत हजारो हिंदु कारसेवक यांच्यावर गोळीबार करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या खा.अवधेश प्रसाद, समाजवादी पक्षाचे आझमगडचा खा.धर्मेंद यादव, आ.नफिस अहमद यासर्वांचा हिंदू द्वेष्टे अबू आजमी यांच्या उपस्थितीत मातोश्री वर बोलावून उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला..
आपल्या कृतीने आपले पिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना झाल्या असतील याचा साधा विचार त्यांनी केला नाही.
आज खरोखर विचार करण्यासारखी बाब आहे की, ज्या हजारो हिंदू कारसेवकानी आपल्या प्राणाची बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला व हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला नक्कीच ठेच पोहचली असेल..
एवढेच नाही तर कळस म्हणजे त्यांनी हा सत्कार स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या तस्वीरी समोर केला.
उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सारे काही सोडून दिलंय. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेने ते सगळं विसरले आहेत.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या विचारांना बगल देऊन ते आपलं राजकारण करतायेत. त्यांच्याबद्दल जास्त बोलता येत नाही. सध्या उद्धव ठाकरेंचे जे काही सुरू आहे ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत.
गेल्या पाच वर्षातला या भरकटलेल्या माणसाचा प्रवास बघा.
2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी नेहमी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस ची साथ घेतली - सोनिया आणि राहुल गांधी समोर नतमस्तक झाले.
बाळासाहेब नेहमी म्हणायचे की काँग्रेसशी हात मिळवणी करण्यापेक्षा मी शिवसेना बरखास्त करीन.
त्यानंतर संभाजी बिग्रेड - जे संघविचाराचे, विश्व हिंदु परिषदेचे कट्टर विरोधक आहेत त्यांच्याशी उद्धव ने युती केली.. दुसरीकडे हिंदू देवदेवातांचा नेहमी अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे सारख्यांना पक्षात मोठे स्थान दिले. संघांचे हिंदुत्व हे शेंडी जानव्हाचे आहे असा उपमर्द केला.
त्यांचे पक्षाचे खासदार हे केवळ मुसलमान मते मिळवण्यासाठी मशीदींचा FSI वाढवून देण्याच्या मागण्या करू लागले.उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व खरेच बेगडी आहे. शरद पवार आणि काँग्रेस सोबत बसणाऱ्यांनी हिंदुत्वाच्या बाता मारु नये. येत्या 20 नोव्हेंबर ला या सर्वांचा हिशोब करायचा आहे.

Comments