top of page

म्हाडा कॉलनीत दहीहंडीचा दणदणीत जल्लोष!

dhadakkamgarunion0
4 days ago
1 min read

म्हाडा कॉलनी, राम मंदिर पश्चिम येथे आयोजक सलमान खान व सह आयोजक बलवंत वर्मा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली व गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला.

थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर गोविंदा आला रे आला! च्या घोषणांनी दणाणून गेला.

हा दहीहंडी उत्सव परंपरा, एकजूट, जिद्द आणि उत्साहाचे सुंदर प्रतीक ठरला.




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page