मुस्लिम समाज आता तरी शुद्धीवर येईल का ?
- dhadakkamgarunion0
- 34 minutes ago
- 4 min read
संपादकीय
अभिजीत राणे
मुस्लिम समाज आता तरी शुद्धीवर येईल का ?
लाल किल्ला बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश प्रचंड हादरला आहे. बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले आपल्या देशाला नवीन नाहीत. कोंग्रेसच्या कृपेने 2004 ते 2014 तर ती नित्याची बाब झाली होती. आपले पंतप्रधान मौन मोहन सिंग यांनी पाकिस्तानला पाठवायची निषेधपत्रे सायक्लोस्टाईल छापूनच ठेवली होती. बॉम्बस्फोट दुर्घटना किंवा अतिरेकी हल्ला झाला की स्थळ , घातपाताची पद्धत आणि मृत्यू पावलेल्या निरपराध नागरिकांची संख्या इतका बदल करून पाकिस्तानची निंदा करणारा प्रस्ताव छापून सरकार डोळ्यावर कातडे ओढवून घेत असे. देशाचे तत्कालीन गृहमंत्री एक आतंकवादी हल्ला झाला की एक नवीन जोधपुरी ड्रेस शिवून तो घालून पत्रकारपरिषदेला जाऊन बसत असत. हे आपण त्या दहा वर्षांच्या कालखंडात भरपूर पाहिले आहे.
2014 साली नरेंद्र मोदींनी सत्ता हातात घेतली आणि या दहशतवादी कारवायांना पायबंद बसला. संपूर्ण देशभर थैमान घालणारा दहशतवाद आता फक्त जम्मू कश्मीर पुरता सीमित झाला होता. त्यात सुद्धा पाकिस्तान समर्थनाने दहशतवादी कृत्य करण्याची प्रचंड मोठी किंमत दहशतवादी गटांना आणि पाकिस्तानला वारंवार चुकवावी लागली होती. ऑपरेशन सिंदूर त्याचेच मूर्त उदाहरण होते.
या पार्श्वभूमीवर लाल किल्ला बॉम्बस्फोट हे मोदी सरकारचे अपयश मानले जात असले तरीही हाती आलेल्या बातम्यांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की संपूर्ण दिल्ली उध्वस्त करण्याचा अतिरेकी संगठनांचा प्रयास होता सरकारला कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी धरपकड सुरू केल्यावर घाबरून जाऊन झालेला हा स्फोट आहे अर्थात मोदी सरकारने देशाला खूप मोठ्या हल्यापासून आणि नरसंहारापासून वाचवले आहे.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटानंतर फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटी अचानक राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेचे नाव दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या 'व्हाईट कॉलर' डॉक्टरांशी जोडले जाणे, हे केवळ धक्कादायक नाही, तर देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक संरचनेसाठी एक गंभीर आव्हान आहे.
अल-फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक, अध्यक्ष आणि ट्रस्टचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. ईडीने त्यांना ४१५ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. सिद्दीकी यांच्यावर यापूर्वीही चिट फंड फसवणुकीचे आरोप होते. अशा पार्श्वभूमीवर, एका शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि दहशतवादी कारवायांशी जोडले गेलेले प्राध्यापक/डॉक्टर, या दोन्ही गोष्टी अल-फलाह युनिव्हर्सिटीला संशयाच्या भोवऱ्यात ओढतात. विद्यापीठाच्या कामकाजात अनियमितता असल्याबद्दल यूजीसी आणि नाॅक (NAAC) कडूनही नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच भारतीय विद्यापीठ संघटनेने (Association of Indian Universities) त्याचे सदस्यत्व निलंबित केले आहे. या सर्व घडामोडी सिद्दीकी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात.
लाल किल्ला स्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी, तसेच डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन शाहिद यांसारख्या उच्चशिक्षित डॉक्टरांचा या दहशतवादी कटात सहभाग उघड झाला आहे. यापैकी काही डॉक्टर अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित होते. डॉ. उमरने स्फोट घडवलेली कार चालवली होती आणि डॉ. मुझम्मिल विद्यापीठाच्या आवारातील निवासस्थानात राहात होता. तपास यंत्रणांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्फोटके आणि अमोनियम नायट्रेटसह अन्य ज्वलनशील सामग्रीचा मोठा साठा आढळला आहे, जी लाल किल्ला स्फोटात वापरलेल्या स्फोटकाशी जुळत असल्याचे सांगितले जात आहे.
एका शैक्षणिक संस्थेच्या आवारात, जिथे वैद्यकीय शिक्षण दिले जाते, तिथे दहशतवादी कट शिजणे, आरोपींना आश्रय आणि संभाव्य अर्थ सहाय्य (terror funding) मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अल-फलाह युनिव्हर्सिटीने स्फोटातील डॉक्टरांशी आपला कोणताही व्यक्तिगत संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, आरोपींना कॅम्पसमध्ये आश्रय मिळणे आणि विद्यापीठातील प्रयोगशाळांचा संभाव्य गैरवापर होणे हे संस्थेच्या नेतृत्वाच्या दुर्लक्ष आणि जबाबदारीच्या अभावाकडे लक्ष वेधते. विद्यापीठाचे संस्थापक सिद्दीकी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असल्याने, दहशतवादी कारवायांना आर्थिक सहाय्य पुरवले गेले आहे का, या दिशेनेही तपास यंत्रणा तपास करत आहेत.
या घटनेचा सर्वात क्लेशदायक आणि चिंतेचा विषय म्हणजे सुशिक्षित डॉक्टर दहशतवादी कारवायांशी जोडले गेले आहेत. डॉक्टर म्हणजे जीवनदाता, समाजातील सर्वात जबाबदार आणि संवेदनशील घटक. त्यांनी घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाचे उद्दिष्ट मानवाचे प्राण वाचवणे असते. अशा बुद्धीजीवी व्यक्तींनी धर्मांधतेच्या आणि कट्टरवादाच्या आहारी जाऊन दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, हे शिक्षण आणि बुद्धीचा घोर पराभव आहे.
• धर्मांधता आणि ज्ञान यांचा संघर्ष: वैद्यकीय शिक्षण वैज्ञानिक विचार आणि तर्कशुद्धता (rationality) शिकवते. या शिक्षणाचा उपयोग करून लोकांना वाचवण्याऐवजी, त्याचा गैरवापर करून लोकांना मारण्याची योजना आखणे, हे दर्शवते की धर्मांधतेची विचारसरणी किती खोलवर रुजलेली आहे आणि ती उच्च शिक्षणालाही निष्प्रभ करू शकते.
• समाजासाठी धोका: जर डॉक्टर किंवा प्राध्यापक यांसारखे 'व्हाईट कॉलर' लोक दहशतवादी बनत असतील, तर ते समाजासाठी अत्यंत घातक आणि चुकीचे आहे. कारण, सामान्य नागरिकांचा या सुशिक्षित वर्गावर मोठा विश्वास असतो. या विश्वासामुळेच ते गुप्तपणे आणि अधिक प्रभावीपणे दहशतवादी कारवाया करू शकतात. या घटनेने संपूर्ण देशाच्या सुरक्षा यंत्रणांना आणि शैक्षणिक संस्थांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी एक चेतावनी दिली आहे.
• धर्माचे विकृतीकरण: धर्माचे मूळ तत्त्वज्ञान नेहमीच मानवी कल्याण आणि शांततेवर आधारित असते. अशा कृत्यांमुळे केवळ निष्पाप लोकांचा जीव जात नाही, तर विशिष्ट धर्माचे विकृतीकरण होते आणि शांतताप्रिय नागरिकांनाही संशयाच्या नजरेतून पाहिले जाते.
अल-फलाह युनिव्हर्सिटी प्रकरण हे केवळ एका शैक्षणिक संस्थेतील अनियमिततेचे नाही, तर शिक्षण, पैसा आणि धर्मांधता यांच्या घातक संगमाचे प्रतीक आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वावर असलेला संशय, आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आणि दहशतवादी डॉक्टरांचे कनेक्शन, याने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा मुळापासून तपास करून, केवळ गुन्हेगारांनाच नव्हे, तर त्यांना आश्रय आणि सहाय्य करणाऱ्यांनाही कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या मंदिरांना कट्टरवादाच्या अड्डा बनवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाऊ नये. सुशिक्षितांनी विज्ञानाची आणि माणुसकीची कास सोडून दहशतवादाचा मार्ग स्वीकारणे, हे राष्ट्र आणि मानवता या दोघांसाठीही अत्यंत विनाशकारी आहे.
इतके दिवस दहशतवादी कृत्य करणारे अपराधी पकडले गेले की मुसलमान समाजाकडून एक तुणतुणे कायम वाजवले जात असे. ते गरीब आहेत, व्यवस्थेने पिडले आहेत. मदरसा मधील शिक्षणामुळे मूलतत्ववादी झाले आहेत. परंतु लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाने या तर्काच्या चिंधड्या चिंधड्या उडवून दिल्या आहेत. उच्चशिक्षित , श्रीमंत , देशाने कोणताही अन्याय केला नसलेले युवक सुद्धा देशद्रोही आणि मानवताद्रोही होतात याचा उघड अर्थ मुसलमानांच्या मानसिकतेत आणि धर्माच्या विचारसरणीत गंभीर स्वरूपाचे दोष आहेत.
संपूर्ण जग परस्परांशी शांततापूर्ण सहजीवन जगण्याचा विचार करत असताना मुस्लिम मात्र जगभरात इतर धर्मियांना आपले शत्रू आणि काफिर समजून दहशतवाद माजवत आहेत आणि हे कटू सत्य आहे. हे जगभर घडते आणि भारत पण याला अपवाद नाही. इस्लामचा जिथे जन्म झाला त्या सौदी अरेबिया मधील आणि संयुक्त अरब अमीराति या देशांमधील सरकारे इस्लामला प्रागतिक, कालसुसंगत , मवाळ आणि सर्वसमावेशक करायचा प्रयास करत असताना भारतातील मुसलमानांचे चालणारे हे उफराटे डोके हा खरोखर सामाजिक चिंतेचा विषय आहे.
केंद्र सरकारने देशभरातील मुल्ला मौलवींना या संदर्भात दोषी ठरवून त्यांच्याशी संवाद साधून इस्लामला कालसुसंगत करण्याचे दडपण आणणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने सगळेच मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात रममाण झाले आहेत.
परंतु या घटनेचे सामाजिक परिणाम आता दिसायला लागले आहेत. सर्वसामान्य नागरिक मुसलमानांचा तिरस्कार करू लागले आहेत. मुस्लिम समाज आता जर सुधारला नाही , कालसुसंगत झाला नाही आणि त्यांनी मूलतत्ववाद कचरा कुंडीत टाकून प्रागतिक आणि सर्वसमावेशक इस्लामची कास धरली नाही तर तो भारतात सामाजिक बहिष्काराचा धनी होऊ शकतो. कोणतेही राजकीय संरक्षण त्यांना समाजाच्या रोषापासून आणि बहिष्कारापासून वाचवू शकणार नाही. संपूर्ण मुस्लिम समाजाने आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे अन्यथा यांचे भवितव्य अंधकारमय आहे यात संशय नाही.








Comments