मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्यात “विकसित भारत संकल्प सम्मेलन” उत्साहात संपन्न
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा आयोजित “12 साल विश्वास के, विकास के, जनकल्याण के – विकसित भारत संकल्प सम्मेलन” उत्साहात संपन्न झाले. भाजपा मुंबई कामगार आघाडीचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 12 वर्षांच्या विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या प्रवासाला जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या बैठकीत अभिजीत राणे यांनी संघटन बळकटीकरण, कामगार हित आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासंदर्भात चर्चा झाली, यावेळी यावेळी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुनील देवधर, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे, प्रभाग समिती अध्यक्षा श्रीकला पिल्ले, भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव, भाजपा मुंबई प्रवक्ते मोहन गौडा, नगरसेवक व जिल्हा महामंत्री दीपक कोटेकर, नगरसेविका व जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रीती साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. केयूर प्रमाणिक तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Comments