महाराष्ट्राच्या विकासाची गाथा थांबणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला विरोधकांवर हल्लाबोल
- dhadakkamgarunion0
- Sep 29
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
महाराष्ट्राच्या विकासाची गाथा थांबणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी साधला विरोधकांवर हल्लाबोल
● देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या घोषणेचे स्वागत करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाचा विकास आणि जनतेचे हित साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येत अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत असताना, विरोधक मात्र केवळ टीका आणि संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. पण या टीकेने विकास थांबणार नाही, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देऊन देशाच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे. या अभियानामुळे देशातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीला मोठे बळ मिळाले आहे. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना यातून मोठा फायदा झाला आहे. सरकारने विविध क्षेत्रांमध्ये स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देत परदेशी गुंतवणुकीलाही आकर्षित केले आहे. महाराष्ट्राने देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीत ४० टक्क्यांहून अधिक वाटा उचलून विकासाला गती दिली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments