top of page

भ्रष्टाचार, मुजोरी आणि एकजूट मुखवट्यात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 7
  • 3 min read

ree

ree

ree

ree

ree

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भ्रष्टाचार, मुजोरी आणि एकजूट मुखवट्यात

उपमुख्यमंत्र्यांचा फोन जर सरकारी असेल तर तो क्रमांक फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच कसा उपलब्ध? संपूर्ण जनतेला न दिल्यास शपथभंग ठरेल आणि त्यातून भ्रष्टाचार स्पष्ट होतो. जर तो व्यक्तिगत फोन असेल आणि लेखी आदेश टाळले गेले असतील तर तीही अधिकाऱ्यांच्या कामात बेकायदेशीर ढवळाढवळ ठरते. थोडक्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भ्रष्ट आहेत हे सिद्धच झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याला लक्ष्य करून गृहमंत्र्यालाच आव्हान दिले गेले, तरी बारामतीचे काका, त्यांची कन्या आणि पुतणे सॉफ्ट जात आहेत. लाचारांचा तांडा म्हणतो—“ही स्टाईल आहे.” पण तुमच्या घरातील स्त्रीशी कुणी असे बोलले तर? भ्रष्टाचार, मुजोरी, दादागिरी सुरू असून कुणी आवाज उठवत नाही. ब्राह्मण-मराठा वादंग पेटवणारे आज हातात हात घालून बसले आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हिंदू संस्कृती तर मुळीच नाही. हे थांबायलाच हवे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भुजबळांच्या वक्तव्यांचा अप्रामाणिकपणा! छगन भुजबळ आज जी जाहीर वक्तव्ये करीत आहेत, ती करण्याचा त्यांना ना कायदेशीर, ना नैतिक अधिकार आहे. मंत्रिपद सांभाळताना मंत्रिमंडळाने घेतलेल्या GR चा विरोध करण्याचा हक्कच नसतो. सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वानुसार प्रत्येक मंत्र्याने निर्णय स्वीकारलाच पाहिजे. जर विरोध करायचाच असेल तर आधी राजीनामा द्या, लाल दिव्याची गाडी सोडा आणि मग बोला. अन्यथा GR विरोधकांना आतून मदत करणे हा सरळसरळ अप्रामाणिकपणा आहे. उघड विरोध करणे म्हणजे लोकशाही व जनतेचा अपमान ठरेल. भुजबळांनी हे लक्षात घ्यावे की खरी ज्ञानप्राप्ती ही फक्त शालेय शिक्षणाने होत नाही, तर देवी सरस्वतीच्या कृपेने होते. मनोज जरांगेंची श्रद्धा, साधना आणि अंतरंगातील ताकद यामुळे त्यांना जे ज्ञान झाले, ते केवळ उपहास करून मिळणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेच्या करहल्ल्याला मोदींचे सडेतोड उत्तर! १ ऑगस्टपासून अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर २५% आयातकर आणि २७ ऑगस्टपासून रशियन क्रूड खरेदीमुळे आणखी २५% दंडात्मक कर लावून बहुतेक भारतीय मालावर तब्बल ५०% ड्युटी लावली. या आक्रमक कारवाईमुळे जीडीपीवर ०.५ ते १% घट होऊ शकते असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला. पण मोदी सरकारने झटपट प्रत्युत्तर दिले. जीएसटीची नव्याने जाहीर झालेली रचना ही भारताच्या अप्रत्यक्ष करव्यवस्थेतील सर्वात मोठी सुधारणा मानली जात आहे. ही रचना सोपी असून सामान्यांच्या खिशात अधिक पैसे ठेवेल आणि देशांतर्गत खप वाढवेल. त्यामुळे अमेरिकन हल्ल्याचा परिणाम जवळजवळ निष्प्रभ होईल. याशिवाय इंग्लंडबरोबरचे प्रलंबित एफटीए मार्गी लावून भारताने आणखी बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, यूएई व युरोपियन युनियनबरोबरही लवकरच करार होणार आहेत. संकटाला संधीमध्ये रूपांतरित करण्याची ताकद भारताने पुन्हा दाखवून दिली आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मराठा समाजासाठी फडणवीसांचा ‘इदं न मम’ भाव! स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर मराठा आरक्षणासाठी सातत्याने झगडणाऱ्या समाजात आज ७५,००० मराठा उद्योजक उभे आहेत. यामागे मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आर्थिक सहाय्य, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ व सारथी संस्थेला केलेले योगदान निर्णायक ठरले. त्यामुळे हजारो विद्यार्थी देशा-परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. आंदोलकांच्या मागण्यांना न्याय देऊन आरक्षणाचा मार्ग मोकळा करूनही फडणवीस यांनी त्याचे श्रेय स्वतःकडे न घेता उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना दिले. ही ‘इदं न मम’ भावना खऱ्या सेवाभावाची साक्ष देते. अशा कार्यानंतरही जातीवरून अपमान करणाऱ्यांनी थांबले पाहिजे. आजचा काळ हिंदू ऐक्याचा आहे; एकोपा आणि जबाबदारीने देश पुढे नेणे हेच खरे धर्मकार्य आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कश्मीरचे खरे रूप – राष्ट्रीय चिह्नावर प्रहार! जेव्हा कधी कश्मीर पर्यटनाचा विषय निघतो तेव्हा मी ठाम सांगतो—“मी कधीच जाणार नाही, आणि भारतावर प्रेम असेल तर तुम्हीही जाऊ नका.” २२ एप्रिल २०२५ च्या पहलगाम हत्याकांडाने हे पटवून दिलं होतंच. तरीही काहींना कश्मीरचे सौंदर्य खेचत असेल तर आजची घटना डोळसपणे पाहा. श्रीनगरच्या हजरतबल दर्ग्यात बसवलेल्या ग्रॅनाईट शिलालेखावर कोरलेले भारताचे राष्ट्रीय चिह्न—सारनाथचे सिंहस्तंभ—कट्टर जमावाने दगड घालून विद्रूप केले. कारण एकच, “धर्मस्थळात आकृती नको.” पण मग त्या नोटा? ज्यावर हेच चिह्न आहे आणि ज्या नोटांसाठी तुम्ही जगता? त्या का वापरता? नालायकपणाचा परमोच्च दाखला देणाऱ्यांशी भारताचा सामान्य नागरिक का जवळीक साधावी? केंद्राचा नाईलाज असला तरी आपण तरी त्यांना पोसण्याची जबाबदारी घेऊ नये.

🔽

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page