भाजपा कामगार आघाडीचा 'सेवा ही संघटन'चा संदेश;रिक्षाचालकांना मोफत छत्र्यांचे वितरण
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या वतीने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या सहकार्याने आज ‘धडक’शी निगडीत रिक्षा चालक सभासदांना प्रवाशांना सेवा देण्यासाठी मोफत छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पी/दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्ष व शिक्षण समितीच्या सदस्य नगरसेविका श्रीकला पिल्ले व बांगूरनगर पोलीस ठण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जयवंत पवार आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष दिपक बाबर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी ‘धडक’चे पदाधिकारी समीर खान, फिरोज खान, दिलीप तिवारी, राजन तिवारी, राकेश पाल, विकी जगवानी, बबलू यादव, संतोष तिवारी, मास्तर, इक्बाल शेख, प्रकाश कांबळे, दिनेश जाधव तसेच भाजपा कामगार आघाडी, मुंबई कार्यालयचे धर्मेंद्र पाल सिंह, अभय झा, रवी बनसोडे, दीनानाथ दुबे व धडक कामगार युनियन पदाधिकारी बबन आगडे, सत्यविजय सावंत, मोहन जाधव, आरती सावंत, गोविंदर सिंह नागी, मयूर सोनवणे आदी पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या "सेवा ही संघटन" या संकल्पनेला अनुसरून समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांचा हा एक भाग असून, रिक्षा चालकांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
#BJP #BJPMumbai #BJPKamgarAghadi #AbhijeetRane #AutoRickshaw #RickshawDrivers #SevaHiSangathan #SeniorCitizens #FreeUmbrellaDistribution #Kandivali #Mumbai










Comments