top of page

प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षाचालकांना मोफत छत्र्या; भाजपा कामगार आघाडीचा अभिनव उपक्रम

  • dhadakkamgarunion0
  • Jul 12
  • 1 min read

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या वतीने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या सहकार्याने आज धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या जोगेश्वरी (प.) येथील ‘आनंद नगर मेगा मॉल विभाग कमिटी ओशिवरा’ रिक्षा स्टँडच्या रिक्षा चालकांना भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दिपक बाबर व विभाग कमिटीचे अध्यक्ष सुशीला जमादार यांनी केले. यावेळी स्टँडच्या कमिटीचे पदाधिकारी दिनेश यादव, फुलवंद सरोज, जियालाल जैस्वाल, राधेश्याम यादव, फौजदार यादव, सुरेश यादव, जीतलाल पाल, रामचंद्र यादव, राजेशकुमार विशश्वकर्मा, रामनाईक जैस्वाल, अनिलकुमार सिंग, सुर्यकांत शाहू, दिपक गौड, अन्तूराम पाल, रामअवध यादव, रामकिशन सिंह, रामआसरे सरोज, प्रकाश राजभर, सदनकुमार मौर्या, दिनेशकुमार यादव, हसंराज चौहान, राधेश्याम चौहान, मुकुल सरोज, कपिल सरोज आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपा कामगार आघाडी, मुंबई कार्यालयचे धर्मेंद्र पाल सिंह, अभय झा, रवी बनसोडे, दीनानाथ दुबे व धडक कामगार युनियन पदाधिकारी बबन आगडे, सत्यविजय सावंत, मोहन जाधव, आरती सावंत, गोविंदर सिंह नागी, मयूर सोनवणे आदी पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी मुंबईच्या "सेवा ही संघटन" या विचारातून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने सेवा उपक्रम राबविले जात असून, रिक्षा चालकांना सक्षम करून नागरिकांना अधिक उत्तम सेवा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page