छावा क्रांतिवीर सेनेच्या १२व्या राष्ट्रीय महाअधिवेशनात शेतकरी,मराठा व सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आक्रमक लढ्याची गर्जना:
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 3 min read
छावा क्रांतिवीर सेनेचे १२वे राष्ट्रीय महाअधिवेशन राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी,कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड,नाशिक येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले.संघटनेच्या बारा वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत शेतकरी,मराठा,कामगार,विद्यार्थी, महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा 'मुंबई मित्र' समूहाचे संपादक अभिजीत राणे होते.प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल,भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण,ॲड.शिवाजी सहाने,सिन्नर नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर,नगरसेविका सौ.हर्षदा गायकर,सौ.साधना मटाले,नगरसेवक नितीन दातीर,शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव,शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके,माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे,छत्रपती युवा सेनेचे चेतन शेलार,सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील,दीपक हगवणे विजय कातोरे,प्रमोद जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अधिवेशनाला शुभेच्छा देत संघटनेच्या सर्व आंदोलनांना व मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.करण गायकर हे माझे लहान बंधू आहेत.गेल्या बारा वर्षांत संघटनेने समाजासाठी केलेल्या कार्याचा मी साक्षीदार आहे.शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभा राहणाऱ्या प्रत्येक लढ्यात मी स्वतः सहभागी होईल,असे त्यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना संघटनेच्या बारा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.संघटनेने आंदोलन,निवेदने,उपोषणे आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे.ही ताकद कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे उभी राहिली आहे,असे त्यांनी सांगितले.
रिंग रोड प्रश्नावर त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की,शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे.चुकीचे अलाइनमेंट बदलून योग्य मोबदला द्यावा तसेच शहरी भूसंपादनासाठी गुणांक 'एच' ऐवजी गुणांक '२'लागू करावा.अन्यथा मंगळवार,३०जून रोजी मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' निवासस्थानी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल."
कार्यक्रमादरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा दूरध्वनी आल्याचे सांगत करण गायकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिल्याची माहिती उपस्थितांना दिली.
भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,करण गायकर हे प्रत्येक अन्यायग्रस्त घटकासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व आहे.रिंग रोडसह शेतकऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांचा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे.छावा क्रांतिवीर सेना ही राज्यातील प्रभावी संघटना असून तिच्या आंदोलनांना शासनाने गांभीर्याने घ्यायला हवे.
ॲड.शिवाजी सहाने यांनी सांगितले की,करण गायकर यांच्यासारख्या जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या नेतृत्वाला आता लोकसभेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे.त्यांना संसदेत पाठविण्यासाठी सर्व समाजघटक व सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे."
भाजप नेते धर्मवीर सुनील बागुल म्हणाले,नाशिकमध्ये अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम धावून जाणारे नेतृत्व म्हणजे करण गायकर.छावा क्रांतिवीर सेनेची राज्यभर मजबूत संघटनात्मक ताकद आहे.या संघटनेच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात मी पूर्वीप्रमाणेच पुढेही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन.
उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले,राजकारणात अपयश आले तरी समाजकार्य न सोडता जनतेसाठी सातत्याने संघर्ष करणारे करण गायकर हे प्रेरणादायी नेतृत्व आहे.त्यांच्या प्रत्येक न्याय्य आंदोलनाला आमचा कायम पाठिंबा राहील.
अध्यक्षीय भाषणात अभिजीत राणे यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सांगितले,राज्यात आक्रमक आणि परिणामकारक संघटना म्हणून छावा क्रांतिवीर सेनेची ओळख निर्माण झाली आहे.गेल्या बारा वर्षांतील प्रत्येक अधिवेशनाचा मी साक्षीदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांचा मी स्वतःपाठपुरावा करणार असून करण गायकर यांना सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही योग्य संधी मिळावी यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू.छावा क्रांतिवीर सेनेचा कार्यक्रम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असला तरी कार्यक्रमाला कधीच गर्दी कमी नसते यातूनच या संघटनेची ताकद काय आहे हे दिसून येते छावा क्रांतिवीर माझे कौटुंबिक नातं आहे.या संघटनेच्या प्रत्येक आंदोलनाच्या पाठीशी मी व धडक कामगार युनियन दैनिक मुंबई मित्र ताकतीने उभे असतात हीच ताकद आणखी मोठ्या प्रमाणात देण्याचा आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शाहीर स्वप्निल डोंगरे यांच्या दमदार शाहिरी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी केले,तर आभार महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी राजे मोरे,शिवा तेलंग,नवनाथ शिंदे,सुभाष गायकर,डॉ.किरण डोखे,अनिल राऊत ॲड विशाल गव्हाणे नितीन शिंदे गणेश माने पांडुरंग मामा मोरे हभप गोरख महाराज आहेर वैभव दळवी,नवनाथ वैराळ,ॲड नवनाथ कांडेकर प्रवीण पाटील,संगीता सूर्यवंशी,सविता वाघ,प्रतिभाताई जगताप,अश्विनी नरगुंदे दिनेश जाधव,संदीप राऊत,प्रकाश सोळंके,हनुमंत तात्या डुबल,नारायण बाबा जाधव,अविनाश शिंदे,राम पाटील गाडेकर,राहुल चाळक,बापू पाटील बोर्डे,मनोहर शिंदे,विठ्ठल भुजाडे,शुभम देशमुख,नाना पालखेडे,भारत पिंगळे,आकाश जाधव,गोरख जाधव,अलीम सय्यद,शुभम महाले,योगेश पाटील,आबा पाटील,किरण लवंड,अमोल देवरे,दत्ता महाराज पवार गोकुळ धोंगडे,कल्पेश उदावंत,अजय कडभाने,दादासाहेब जोगदंड,योगेश अहिरे,योगेश शिंदे,रवींद्र जयस्वाल,दत्ता कवडे पाटील,शाहरुख मंसूरी,इरफान सय्यद,महेश हिरे,दीपक पवार,अक्षय ढमाले,यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिवेशनात शेतकरी,मराठा, कामगार,विद्यार्थी,महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक व्यापक आणि आक्रमक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.समाजकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेच्या न्यायासाठी छावा क्रांतिवीर सेना आगामी काळात अधिक जोमाने कार्यरत राहील,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

























Comments