गोरेगाव आरे कॉलनीतील बिबट्या दहशतीबाबत कामगार नेते अभिजीत राणेंचा प्रत्यक्ष दौरा
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
गोरेगाव येथील गणेश नगर, आरे कॉलनी परिसरात बिबट्याच्या वाढत्या सुळसुळाटामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाबाबत नागरिकांच्या वतीने भाजपा, कोकण विकास आघाडी उत्तर पश्चिमच्या सचिव सुषमा कुर्ले यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी संबंधित जागेचा प्रत्यक्ष दौरा व पाहणी केली.
परिसरातील अपुरी प्रकाशव्यवस्था, अंधारामुळे वाढलेला धोका, महिला-मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच बिबट्याच्या हालचालींमुळे निर्माण झालेली दहशत याबाबत अभिजीत राणे यांनी स्थानिक नागरिकांशी सविस्तर संवाद साधला.
यावेळी लवकरच या प्रकरणी वनमंत्री व वनविभागाशी थेट चर्चा करून बिबट्याच्या सुळसुळाटाचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावू, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा विषय शेवटपर्यंत लावून धरण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.




























































Comments