"गणेशोत्सवानिमित्त आरे मंडळाची कोकणवासीयांसाठी मोफत एसटी सेवा; कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून हिरवा झेंडा"
भारतीय जनता पार्टी आरे मंडळ च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणारयांसाठी आज गोकुळधाम, गोरेगाव पूर्व ते सावंतवाडी मोफत एसटी सेवा कोकण वासियांसाठी देण्यात आली. या एसटी सेवेस कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आरे मंडळाचे अध्यक्ष महेंद्र झगडे महामंत्री रवींद्र तिवारी, सचिव शरद तिरस्कार, उपाध्यक्ष उमेश तिवारी, यश तेली, हर्षद देऊळकर, विजय मिस्त्री, नितीन तोरसकर मान्यवर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













Comments