उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
- dhadakkamgarunion0
- Aug 12
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
● उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, जनादेश चोरणाऱ्यांनी लोकशाही शिकवू नये. ‘आम्ही लोकांच्या प्रेमाची आणि मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. पण उद्धव ठाकरेंनी जनादेशाची चोरी केली. म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवले आहे.’ हा आरोप करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कोविड घोटाळ्याचाही उल्लेख केला आणि कफन खरेदीतील गैरव्यवहारावरून ठाकरेंना 'कफन चोरांचे सरदार' म्हणायचे का, असा सवालही केला.
-अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments