🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Sep 29
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगच्या केंद्रस्थानी!!! दिल्लीतील ‘देवेन्द्र-नरेन्द्र’ बैठकीत महाराष्ट्रासाठी तीन नवीन डिफेन्स कॉरिडॉर्सचा प्रस्ताव मांडण्यात आला—पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर, अमरावती-वर्धा-नागपूर-सावनेर आणि नाशिक-धुळे. हे कॉरिडॉर्स म्हणजे केवळ संरक्षण उद्योग नव्हे, तर राज्याच्या औद्योगिक पुनरुत्थानाची संधी. अत्याधुनिक उत्पादन, संशोधन संस्था, तंत्रज्ञान केंद्रे यामुळे कौशल्यविकास, रोजगार आणि MSME साखळीला गती मिळेल. जेएनपीटी व वाढवण बंदरांमुळे निर्यातीत महाराष्ट्र अग्रस्थानी राहील. रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स आणि कम्युनिकेशन नेटवर्कमध्येही सुधारणा होईल. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना बळ मिळेल. महाराष्ट्र हा देशातील डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. या दूरदृष्टीला शुभेच्छा—वेल-डन देवेन्द्रजी.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नवी मुंबईत ड्रग्सचा गड कोसळला! ठाकरे सरकारच्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांचा अड्डा बनला होता. स्थानिकांच्या तक्रारींवर दुर्लक्ष, वरून संरक्षण, आणि तरुण पिढीच्या बरबादीचा आरोप—ही चित्रं भयावह होती. मात्र महायुती सरकारच्या आगमनानंतर गृहमंत्रालयाने पोलिसांना फ्री-हॅन्ड दिला आणि कारवाईचा धडाका सुरू झाला. या वर्षी आतापर्यंत ₹38 कोटींचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले, 2854 आरोपी अटकेत गेले, त्यात 101 आफ्रिकन नागरिकांकडून ₹40 कोटींची जप्ती झाली. शिवाय 2034 बेकायदेशीर आफ्रिकन नागरिकांना देशाबाहेर हाकलण्यात आले. MCOCA अंतर्गत 7 मोठ्या तस्करांवर कारवाई झाली. एकूण 1831 प्रकरणांची नोंद झाली. नवी मुंबई पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमता आणि गृहमंत्रालयाचा ठाम पवित्रा—हे दोन्ही मिळून शहराला नवसंजीवनी देत आहेत. वेल-डन नवी मुंबई पोलिस. वेल-डन गृहमंत्रालय.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ध्वनीच्या मर्यादेत विवेक हरवतोय का? पुण्यासारख्या शहरात खासदार मेधाताईंचा घेतलेला ठाम स्टॅन्ड हा केवळ धाडस नव्हे, तर विवेकाचा आवाज आहे. सार्वजनिक ठिकाणी डीजे, डॉल्बीच्या गोंगाटामुळे होणारा त्रास, आरोग्याला धोका आणि कायद्याच्या मर्यादेचा भंग—हे सर्व मुद्दे त्यांनी मांडले. आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरही त्यांनी कारवाई न केल्याचा आरोप केला. दुर्दैवाने, आपल्या राज्यात आवाजाच्या मर्यादा केवळ कागदावर आहेत. सण कोणताही असो, पोलिसांनी नियम पाळायला लावले पाहिजेत. अन्यथा, धर्माच्या नावावर गोंगाट आणि मनोरंजन यांचं मिश्रण होतं. देवीच्या आरतीपेक्षा गरब्याला जास्त गर्दी होते, हे चित्र ‘धर्म की भक्ती की की शो?’ असा प्रश्न विचारायला भाग पाडतं. मेधाताईंनी दाखवलेला विवेकाचा मार्ग हा केवळ पुण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आरसा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
होय मी शंभर वर्षांचा झालोय…होय, मी एका वाड्यात जन्म घेऊन आज अखंड राष्ट्राच्या मनात घर केलेलं आहे. मी—राष्ट्रीय स्वयंसेवक संघ—शंभर वर्षांचा झालोय. हजारो आहुती, हल्ले, लांछन, शिव्याशाप स्विकारत मी उभा राहिलोय. सेवावृत्तीचे प्रकल्प, आपत्तीच्या काळात दिलासा, संस्कारांची लाखो शाखा, आणि राष्ट्र सर्वोपरीचा मंत्र—या साऱ्यांनी मला घडवलंय. भगवा ध्वज माझा गुरु, तन-मन-धन समर्पणाचं साधन, आणि “नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…” ही माझी शपथ. मी हिंदू म्हणून जगलो, राष्ट्रहितासाठी प्रेरणा दिली, आणि अख्ख्या जगात संस्कृतीचा प्रचार केला. आज मी शंभर वर्षांचा झालोय—हे केवळ कालगणनेचं नव्हे, तर तपश्चर्येचं, समर्पणाचं आणि राष्ट्रभक्तीचं शतक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“ नमस्ते सदा वत्सले हे मातृभूमे “शताब्दीच्या सूरांनी नांदलेली प्रार्थना!!! १९३९ मध्ये सिंधी रेल्वे येथे नरहरी नारायण भिडे यांनी रचलेली संघ प्रार्थना आज शंभर वर्षांच्या वाटचालीत एक नवे दैदीप्यमान रूप घेऊन समोर आली आहे. यादवराव जोशी यांनी दिलेल्या चालीत पुण्यातील शिबिरात प्रथम सादर झालेली ही प्रार्थना आजही प्रत्येक स्वयंसेवकाच्या हृदयात तेवते. यशराज स्टुडिओमध्ये लंडनच्या फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या साथीनं शंकर महादेवन, राहुल रानडे, सचिन खेडेकर, हरीश भिमानी यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेली ही प्रार्थना ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. शुद्ध उच्चार, भावगर्भित अर्थ आणि संगीताची भव्यता यांचा संगम म्हणजे राष्ट्रभक्तीचा उत्कट अनुभव. २७ सप्टेंबरला तारखेप्रमाणे संघाच्या शताब्दीचा प्रारंभ झाला असून विजयादशमीला तिथीनुसार हा सोहळा साजरा होणार आहे. ही प्रार्थना म्हणजे शतकभराच्या संस्कारांची गूंज.
🔽
#MaharashtraDefence #WarOnDrugs #SoundOfWisdom #RSS100Years #SanghPrayerCentenary #DevendraFadnavis #NarendraModi





Comments