top of page

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 24
  • 3 min read

 अभिजीत राणे लिहितात

“काँग्रेसच्या अपयशी प्रकल्पांनी मुंबईकरांचे हाल!” काँग्रेस आघाडी सरकारने मुंबईच्या डोक्यावर टाकलेले मोनोरेल आणि स्कायवॉकसारखे प्रकल्प हे अक्षरशः अपयशाची जिवंत उदाहरणे आहेत. गर्दीच्या ठिकाणी मेट्रोची गरज असताना, मोनोरेल चुकीच्या ठिकाणी आणली गेली. मार्ग आखणी चुकीची, वापरकर्ते कमी आणि उभारणीवर कोट्यवधींचा अपव्यय – अखेरीस हा प्रकल्प मुंबईकरांच्या पैशांवर घाव घालणारा ठरला. त्याचप्रमाणे स्कायवॉक – डंकेच्या ठोक्यावर उद्घाटन झाले, पण वापरकर्तेच नाहीत. काही स्कायवॉक तर अक्षरशः भंगार बनून पडले आहेत. एवढं करूनही काँग्रेसने कधी जबाबदारी स्वीकारली नाही. मुंबईकरांना खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास मिळायला हवा होता, पण उलट या अपयशी प्रकल्पांमुळे त्यांच्या खिशावर आणि डोक्यावर अधिक ताणच आला. काँग्रेसचे धोरण हे नेहमीच “जाहिरातींचा गाजावाजा, प्रत्यक्षात दुर्लक्ष” असे राहिले आहे, आणि त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागला आहे.

 अभिजीत राणे लिहितात

“SIR हवेच – घुसखोरांविरोधात निर्णायक पाऊल!” बिहारमध्ये SIR दरम्यान ३५ लाख नावं कट झाल्याची चर्चा होते आहे. पण गंमत बघा—यातील ३५ लोक जरी खरे असतील तर ते का पुढे येऊन तक्रार करत नाहीत? कारण प्रत्येकालाच आपला खरा इतिहास माहिती आहे. पण काही राजकारण्यांच्या पोटात मात्र कालवाकालव होत आहे. प्रश्न पडतो, हेच का ते लोक ज्यांना विदेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या मदतीने निवडणुका जिंकायच्या होत्या? मग त्यांना ही योजना खटकणारच!SIR योजना ही फक्त नावं कापण्याची मोहीम नाही, तर देशातील मतदारयादी शुद्ध ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. घुसखोरांच्या सावलीत राजकारण करणाऱ्या मंडळींना आता धास्ती वाटते आहे. झारखंडसह प्रत्येक राज्यात SIR राबवणे ही काळाची गरज आहे. देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठं काहीच नाही—आणि SIR हा त्याचाच भक्कम पाया आहे.

 अभिजीत राणे लिहितात

“फडणवीसांचा दृष्टिकोन – मेट्रो बनली मुंबईची जीवनवाहिनी!” मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली तरी मेट्रो मात्र ठप्प झाली नाही! चार दिवसांत तब्बल २० लाख प्रवाशांनी मेट्रोची निवड केली. याचा अर्थ स्पष्ट आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टीने आखलेले मेट्रो प्रकल्प आता खऱ्या अर्थाने मुंबईकरांचे जीवन वाचवणारे ठरत आहेत. लोकलवरचा भार कमी करून, प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवास देण्याचं स्वप्न फडणवीस यांनी पाहिलं आणि ते पूर्णत्वाला नेलं. मेट्रो २, ३ आणि ७ या मार्गांनी शहराला नवी दिशा दिली असून, भविष्यातील वाहतूक नियोजनासाठी मेट्रोचाच आधार होणार हे आता सिद्ध झालं आहे. विकास हा फक्त कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये दिसतो—याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची मेट्रो. मुंबईकरांची जीवनवाहिनी उभी करणाऱ्या फडणवीसांना सलाम!

 अभिजीत राणे लिहितात

 “फडणवीसांचा ‘वॉर रूम’ मंत्र – उद्योगवृद्धीला नवा वेग!” महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्राला नवा श्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये 100 बदलांची दिशा दिली आहे. यासाठी स्वतंत्र वॉर रूम उभी राहणार असून, त्याचा मासिक आढावा स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत. उद्योगांना मिळणाऱ्या परवानग्या जलद आणि पारदर्शक व्हाव्यात, शेतकऱ्यांसाठी कृषीप्रक्रिया उद्योगांना परवानगीची गरज भासू नये, अशा ठोस सुधारणा राबविल्या जात आहेत. ‘मैत्री कायदा’, ‘मैत्री सिंगल विंडो सिस्टीम’, बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट आणि मिलाप पोर्टल यासारख्या उपक्रमांनी उद्योगस्नेही वातावरण निर्माण केले आहे. आता ‘लँड बँक’, ‘डेडिकेटेड एक्सपोर्ट पोर्टल’ आणि ‘एक तालुका, एक समूह’सारख्या उपक्रमांतून उद्योगवृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल. महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक ठिकाण ठरेल, यासाठी फडणवीस सरकारचा हा ‘वॉर रूम मंत्र’ म्हणजे उद्योगविश्वासाठी दिलासा आणि भविष्याचा विश्वास आहे.

 अभिजीत राणे लिहितात

अमेरिकेच्या जीएम विषाला ठाम नकार! अमेरिका आपल्या बाजारपेठेतून जेनेटीकली मॉडिफाईड क्रॉप्सच्या नावाने हळूहळू विष पेरते आहे. स्विट कॉर्न हे त्याचं जिवंत उदाहरण! एकेकाळी देशी मका आपल्या शेतकऱ्यांचा आधार होता, पण अमेरिकन गोड विष इतकं पसरलं की जमिनीच त्याचं गुलाम बनल्या. शेतकरी म्हणतात—जिथे स्विट कॉर्न आलं, तिथे दुसरं काही उगवतच नाही. आणि शरीरात साखरेचा मारा करून लठ्ठपणा, डायबिटीस, अकाली वृद्धत्व यांची भेट देते. आता ट्रम्प भारताला आणखी जीएम बियाण्याचं आमिष दाखवतोय. ही योजना स्वीकारली, तर फक्त आपल्या शेतकऱ्यांची जमीनच नव्हे तर तरुणाईचं आरोग्य आणि भारताचं भविष्यही बर्बाद होईल. अमेरिकेचं धोरण एकच—भारत महासत्ता होऊ नये. म्हणूनच मोदीजींनी दिलेला आत्मनिर्भरतेचा संदेश आपल्याला कवटाळावा लागेल. आपण ठामपणे म्हणूया—भारतीय शेतकरी आणि जनता ही कोणत्याही अमेरिकन प्रयोगाची प्रयोगशाळा नाही!

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page