🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 3
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
युरोपियन युनियन च्या 27 देशांनी रशियावर अजून निर्बंध वाढवले. यात रशियाकडून येणारे तेल मग ते कोणत्याही देशामार्फत असेल ते तेल न घेण्याचा ठराव पास केला.आता हा ठराव अप्रत्यक्षपणे भारताला टार्गेट करत होता. आज घडीला संपूर्ण युरोपला तेल पाठवणारा भारत हा सर्वात मोठा निर्यातदार आहे. रोज जवळपास 20 लाख बॅरेल तेल भारत रिफाईन करून पाठवतो.2027 पर्यंत हा आकडा 30 लाख बॅरेल पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल भारतीय रुपयांमध्ये घेतो अन त्याला पेट्रोल,डिझेल,विमानाचं पेट्रोल तयार करून ते युरोपीय देशांना डॉलर मध्ये विकतो.अन ट्रम्प तात्या यावर प्रचंड नाराज आहे.पण भारताने यावर काहीही प्रतिक्रिया न देता आफ्रिकन देशांना तेल विकण्यास सुरुवात केलीय. अन इकडे युरोपीय देशांमध्ये पेट्रोल,डिझेलचा प्रचंड तुटवडा झालाय.कारण युक्रेन युद्धामुळे युरोपियन देशांनी रशियाकडून तेल घेण्यास नकार दिलाय.आता त्यांच्या देशात भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागतोय.त्यामुळे हैराण झालेल्या अनेक युरोपियन देशांनी तेल पाठवण्याची विनंती भारताकडे केलीय. ये नया भारत है , ये झुकता नही झुकाता है.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डिसेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी त्याच्या मते काहीतरी अत्यंत धक्कादायक असे बोलणार होता.त्यावेळी त्याने संसदेत असे बोलून दाखवले की तो जे काही सांगणार आहे त्याने भूकंप होईल.त्यावर संसद सदस्यांनी 'ठहाके लगाके ' त्याच्या या घोषणेला प्रतिसाद दिला.अभिनेते परेश रावल तेव्हा खासदार होते.ते या भूकंपाबद्दल म्हणाले की राहुल गांधी कागदावर चे न वाचता, न अडखळता,कोणती ही चूक न करता १५ मिनिटे सलग बोलू शकले तर पृथ्वी केवळ हलणार नाही तर नाचेल.त्यानंतर राहुल बोलला पण भाजपच्या खासदारांनी ज्याची भरपूर थट्टा केली तो भूकंप झालाच नाही. आता काल राहुल गांधीने म्हटले आहे की मध्यप्रदेशातील आणि महाराष्ट्रातील निवडणुकांचा सहा महिने अभ्यास केल्यावर आमच्या लक्षात आले आहे की निवडणूक आयोग भाजप ला मदत करण्यासाठीच्या मतदान घोटाळ्यात सामील आहे.जी माहिती आम्हाला मिळाली आहे ती म्हणजे अणुबॉम्ब आहे,अणुबॉम्ब.येत्या ५ऑगस्टला बेंगरुळू मध्ये आम्ही त्याचा स्फोट केल्यानंतर भारतात निवडणूक आयोग शिल्लक च राहणार नाही. स्वतःबद्दल कायमच अवास्तव कल्पना बाळगणाऱ्या राहुल गांधीला आपला तो बाब्या सारखे आपला तो अणुबॉम्ब असे वाटत असेल, इतकेच.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
"विहीर नको पण सरकारी अधिकारी आवरा" असं म्हणायची वेळ आता शेतकऱ्यांवर आलीय. महाराष्ट्रात जेवढ्या शेत विहिरी सरकारी अनुदानाने खंदण्यात आल्या त्या मनरेगा मजुरांच्या माध्यमातून खणण्यात याव्यात असा सरकारी नियम केला गेला आहे. असे मजूर फक्त कागदावर आहेत. मनरेगा कागदावर आहे. मस्टर फेक बनवले जाते.सरसकट विहिरी यंत्रांचा वापर करून खणल्या जातात आणि फाईल या टेबलवरून त्या टेबलवर फिरवण्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजारपर्यंत रक्कम आधी द्यावी लागते. त्याचबरोबर अनेकांचे सरकारी अनुदान विहिरी खंदून २-२ वर्षे झालं तरी अजून खात्यावर येण्याचा पत्ता नाही. ही योजना मजुरांना रोजगार देवो न देवो सरकारी अधिकार्यांना मात्र यातून एक उत्पन्नाचा स्त्रोत प्राप्त झाला आहे. एकतर सरकारने मनरेगाची अट रद्द करावी किंवा थेट विहीर खणल्यानंतर सॅटेलाईटचा वापर करून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे.अश्या अनेक योजना आंधळे दळत आहे आणि कुत्रे पीठ खात आहे पद्धतीच्या असतात. शहरी लोकांना सरकारच्या घोषणा ऐकून सरकार खूपच काम करतंय असे वाटायला लागतं पण जमिनीवरील वास्तव मात्र शून्य असते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जागतिक शांतता स्थापित करण्यासाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कायमच वादाच्या भोवर्यात राहिला आहे. हा पुरस्कार महात्मा गांधी यांना मिळणार होता पण ब्रिटीशांच्या कडव्या विरोधामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. याच पुरस्काराची आस पंडित जवाहरलाल नेहरू यांना होती म्हणूनच पंचशीलच्या घोषणा झाल्या , हिन्दी चीनी भाई भाई झाले परंतु तरीही पुरस्कार लाभला नाहीच. बराक ओबामा यांनी त्यांच्या सत्ताकाळात येमेन , सिरिया आणि इराकला बेचिराख केले. अफगाणिस्तान मध्ये सुद्धा प्रचंड नरसंहार घडवला नंतर गुड तालिबान बॅड तालिबानचा शब्द्च्छल केला. 10 लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या मृत्युला ते जबाबदार आहेत परंतु त्यांना पडद्यामागून चाव्या फिरवण्याचे कसब ज्ञात असल्याने त्यांनी जागतिक शांतता स्थापित करण्याचे नोबेल पटकावले. आमचे ट्रंप तात्या पडले रांगडे आणि आडदांड गडी. त्यांनी धसमुसळेपणा करून युक्रेन रशिया युद्ध थांबवण्याचा प्रयास केला, ते साधले नाही. भारत पाकिस्तान मध्ये मध्यस्थी केली म्हणून घोषणाबाजी केली पण भारताने त्यांना उघड कोलले. त्यामुळे आता व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांना,” ट्रंप तात्यांना नोबेल द्या हो !” अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राज ठाकरे यांचा उर्मटपणा आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांची गुंडगिरी आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य शब्दात ठणकावले आहे,”अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलांसारखे वागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. कायद्याच्या विरोधात वागणाऱ्या लोकांसाठी तो कायदा आहे. आंदोलकांविरुद्ध हा कायदा नाही. सरकारविरुद्ध बोलण्याची पूर्ण मूभा असून त्यांच्याविरुद्ध हा कायदा नाही. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे कायदा न वाचता असे वक्तव्य केले आहे. “असा शेलका टोला सुद्धा देवाभाऊंनी लगावला. त्याच प्रमाणे पुण्यातील औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरी वर सुद्धा त्यांनी सूचक भाष्य केले आहे. “पुण्याच्या उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी पाहायला मिळते. विविध पक्षांचे नाव घेऊन ते दादागिरी करतात. ही दादागिरी मी मोडून काढणारच आहे. यामध्ये मदत करणाऱ्यांचेही स्वागत आहे.”थोडक्यात आता देवाभाऊ आता नृसिंह अवतार धारण करणार आहेत. याचीच महाराष्ट्राची जनता आतुरतेने वाट पहाट होती.
🔽












Comments