🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 3
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रंप आपण निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकत चालले आहेत. शीतयुद्धाच्या समाप्ती नंतर प्रथमच रशिया आणि अमेरिका सामरिकदृष्टीने समोरासमोर येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ल्वादिमीर पुतिनने पुढे केलेल्या रशियाचा पूर्व राष्ट्रपती आणि सध्याचा रशियन सुरक्षा समितीच्या अध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्हने डोनाल्ड ट्रम्पला आणि अमेरिकेला उघडं पडलं आहे, ते पण इतकं की डोनाल्ड ट्रम्प आपण कोण आहोत हे विसरून मेडवेदेव्हची व्यक्तिगत पातळीवर जाऊन मानहानी करत आहे. अर्थात यात रशियन जास्त हुशार निघालेत, त्यांनी ट्रम्पला सोयीच्या मैदानात ओढलं आहे. गेली ३ वर्ष युक्रेनच्या आडून रशियाबरोबर युद्ध करणाऱ्या अमेरिकेने प्रथमच रशियाविरोधात योग्य ठिकाणी आण्विक पाणबुड्या पाठवल्या आहेत. थोडक्यात अमेरिका आणि युरोपच्या विरोधात भारत, रशिया ( थोडा चीन ), इराण संघटित आणि शांतपणे कार्यक्रम करत आहेत. हे सगळे मिळून डोनाल्ड ट्रम्पला बहुतेक ठार वेडा करूनच सोडणार.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
प्रकाश आंबेडकरांनी असा प्रश्न विचारला आहे की जर मालेगाव खटल्यातील सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष सुटले तर मग तो स्फोट कुणी घडवला? अगदी हाच प्रश्न हे च प्रकाश आंबेडकर काही दिवसांपूर्वी जेव्हा २००६ च्या मुंबई सीरियल रेल्वे बॉम्ब स्फोट खटल्याचा निकाल लागून सर्वच्या सर्व १२ मुस्लिम आरोपी निर्दोष सुटले तेव्हा विचारू शकले असते पण तेव्हा भीम-मिम युती मनात असल्यामुळे ते गप्प बसले होते.आता भीम आणि सनातन ची युती त्यांनाच नको असल्यामुळे बरोब्बर आत्ताच त्यांना हा प्रश्न सुचणे साहजिकच आहे. मालेगावात बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी त्या ठिकाणी फक्त स्फोटात मारले गेलेले,जे जखमी झाले ते आणि आरोपींपैकी काही जण एव्हढेच लोक होते?कशावरून या सात जणांखेरीज दुसऱ्या कोणी तो स्फोट घडवून आणला नसेल?बॉम्ब स्फोट तर अनेक वेळा रिमोट कंट्रोल ने पण करण्यात आले आहेत.कशावरून कोणी अन्य गुन्हेगारांनी रिमोटचा वापर करून दूर अंतरावरून घडवले नसतील? कशावरून पोलिस तपास नकळत वा अन्य काही कारणाने किंवा जाणून बुजून भरकटला/भरकटवला गेला नसेल? एका वकिलाने न्यायालयाच्या निकालावरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे लज्जास्पद आहे. परंतु आंबेडकर यांना तो विवेक नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आणि भगवा दहशतवाद हा कोंग्रेस पक्षाने मांडलेलं मुद्दा संपूर्ण उध्वस्त झाला. संपूर्ण देशात कोंग्रेसच्या विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला. लोकांचा हा संताप बघून या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणारे सर्व कोंग्रेसी नेते वरमले आणि आता स्पष्टीकरण देऊ लागले आहेत. दिग्विजय सिंग आता म्हणत आहेत की हे बॉम्बस्फोट संघाने घडवले असे मी कधी म्हणालोच नाही. सोशल साईटवर हिंदुत्ववाद्यांनी हे शीर्षक असलेल्या कार्यक्रमातील त्यांचा भाषण करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल केला. सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट कबूल केले की पक्षाकडुन आदेश आला होता म्हणून मी भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केला. याचा अर्थ काय ? तर तत्कालीन कोंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि ख्रिस्ती धर्मप्रसारक सोनिया गांधी यांच्या आणि त्यांचे सचिव अहमद पटेल यांच्या डोक्यातून हा हिंदूंचा अपमान करणारा शब्द बाहेर पडला आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या पटलावर हिंदू हिंसक होते है ही भीष्मवाणी उच्चारली होती. आता न्यायालयाच्या निकालानंतर सगळे बोलके पोपट झाले आहेत. परंतु देशभरातील हिंदूंनी आता कोंग्रेसला समूळ आणि कायमचे गाडून टाकणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नायरा एनर्जी या भारतीय कंपनीत रशियन कंपनी रोसफेनचा 49 % हिस्सा आहे. यूरोपियन महासंघाने रशियावर 18 जुलै रोजी अतिरिक्त निर्बंध लादले आणि मायक्रोसॉफ्टच्या यूरोपियन विभागातील अधिकार्यांच्या सांगण्यानुसार नायरा कंपनीच्या सर्व सेवा कोणतीही पूर्वकल्पना न देता तत्काळ थांबवल्या आणि त्यांचे सगळे सर्व्हर व डेटा गोठवला. म्हणजे कंपनीचे कर्मचारी एकमेकांना ई मेल सुद्धा पाठवू शकत नव्हते. या मनमानी वर्तनाच्या विरोधात नायरा एनर्जीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे हे लक्षात आल्यावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या सेवा पूर्ववत सुरू केल्या. उच्च न्यायालयाने या प्रकरणात मायक्रोसॉफ्टवर प्रचंड ताशेरे ओढले. एक अमेरिकन कंपनी , एका भारतीय कंपनीवर आपल्या युरोपातील अधिकार्यांच्या सांगण्यावरून अशी एकतर्फी कारवाई करू शकत नाही. तुमचे हे वर्तन अपरिपक्व आहे आणि भविष्यात कोणत्याही कंपनीच्या संदर्भात असे वर्तन केले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल या शब्दात मायक्रोसॉफ्ट कंपनीला न्यायालयाने सज्जड दम भरला आहे. परंतु यामुळे भारतात मायक्रोसॉफ्टला पर्याय असणार्या ऑपरेटिंग सिस्टिमचा सरकारी पातळीवर आणि मोठ्या कंपन्यांच्या पातळीवर वापर सुरू करण्यासंदर्भात गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नांदणीतील जैन मठामध्ये ३३ वर्षे राहणारी महादेवी (उर्फ माधुरी) ही हत्तीण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आजारी आहे असे पेटा या प्राण्यांच्या संदर्भातील क्रूरता नष्ट करणार्या संघटनेला आढळून आले. त्यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने तिला रिलायन्स फाउंडेशन द्वारा चालवलेल्या वनतारा प्रकल्पात पाठवून तिची योग्य देखभाल करा असा आदेश दिला. त्यानुसार तिची रवानगी केली गेली. राजकारणी मंडळी यात उतरली आणि त्यांनी भावनात्मक राजकारण सुरू केले. हत्तीण आजारी पडली , तिची देखभाल मठाने केली नाही. लाखो रुपये कमवण्यासाठी मठाने तिला मोहरमच्या मिरवणुकीत काही शे किलोमीटर दूर पाठवले याचा सगळ्यांना विसर पडला आणि अंबानी यांना शिवीगाळ आणि जियो पोर्ट मोहीम सुरू झाली. आता अंबानी परिवारांने नांदणीमध्येच त्या हत्तिणीची काळजी घेणारे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ती हत्तीण नांदणीमध्ये परत येईल. परंतु यातून आपल्या लोकांची विकृती दिसून येते. त्या मुक्या प्राण्याचे हाल होत असताना कुणालाही दया आली नाही. परंतु राजकारण करण्याची संधी दिसल्यावर सगळे सरसावले. ही हिडीस आणि घाण प्रवृत्ती आता महाराष्ट्राची ओळख बनली आहे.
🔽












Comments