🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 27
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नरेंद्र मोदींच्या नावावर अजून एक पराक्रम नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४,०७८ दिवस भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळण्याचे रेकॉर्ड स्थापित केले आहे. आता मोदीजी हे भारताचे दुसरे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहिलेले नेते बनले आहेत.अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत केलेला हा विक्रम खरेच भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपदी राहण्याच्या विक्रमाला त्यांनी मागे टाकले आहे. इंदिराजींनी जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ या कालावधीत सलग ४,०७७ दिवस पंतप्रधान म्हणून काम केले होते आणि आता पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधानपदी सलग ४०७८ दिवस सलग काम करून विक्रम केला आहे. या अकरा वर्षात मोदींनी देशाला अक्षरशः खाईतून वर उचलले आहे. खड्ड्यात जाणार्या अर्थव्यवस्थेला चौथ्या क्रमांकावर आणायचा पराक्रम त्यांनी करून दाखवला आहे. आज भारत संरक्षणक्षेत्रात प्रथम क्रमांकावर पोचला आहे. ऑपरेशन सिंदूर सारखा पराक्रम आजवर कुणालाही करून दाखवला नाही. आज संपूर्ण जग भारताच्या सामर्थ्य , प्रगतीमुळे विस्मयचकित झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जगदीश धनखड प्रकरणात हा धडा मिळतो की केंद्र सरकारच्या उच्च पदावर भाजप किंवा संघातून आलेले किंवा योगींसारखे कट्टर हिंदुत्ववादी धर्मनिष्ठ कार्यकर्तेच बसवावेत. हा राष्ट्रीय सुरक्षा व स्थिरतेचा मामला आहे. उच्च पदस्थांचे आऊट ऑफ फोकस वागणे सरकारला अडचणीत आणू शकते. मुळातच धनखड हे भाजपाच्या विचारधारेचे नाहीत. त्यांना अरुण जेटली यांनी भाजपा मध्ये आणले. भाजपच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी धनखड यांना दूर केले. तसेच अतिरिक्त सुरक्षा म्हणून त्यांची आयटी आणि पब्लिक रिलेशन्स टीम ऑफिसच्या बाहेर काढून तिथला ताबा घेतला. धनखड यांच्यासाठी फेअरवेल पार्टी झाली नाही, समारंभ झाला नाही, आणि त्यांना फेअरवेल चे भाषणही करता आले नाही. यातून गोष्टी किती तातडीने व गंभीरतेने घडलेल्या असतील याची कल्पना येते. पण सरकारचा भाग बनून सरकारची नाचक्की करणारे जे कोणी असतील त्यांना कठोर पणाने बाजूला सारले जाईल हा संदेश मोदींनी दिलेला आहे. त्यामुळे मोदींवरचा आमचा विश्वास आणि प्रेम आणखी वाढले आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकारने सुद्धा सावध होऊन आपल्याकडील झारीतील शुक्राचार्य शोधणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
केंद्रसरकारने एन आर सी कायदा अर्थात नागरिकत्व सिद्ध करणारा कायदा आणल्यावर डफली गॅंग आणि आंदोलनजीवी मंडळींनी शाहीन बागेत भला मोठा तमाशा सुरू केला होता. त्याला आम आदमी पार्टी आणि कोंग्रेसची रसद होती आणि सर्वोच्च न्यायालयाचा आशीर्वाद. त्यामुळे शाहीनबाग मध्ये 500 रुपये घेऊन मुस्लिम शेरणी फुकटचा लंगर झोडत रस्ता अडवून बसल्या होत्या.कोरोंना आल्याने त्यांची उचलबांगडी झाली. परंतु मोदी सरकारने जातिगत जनगणना हा राहुल गांधी यांनी पेटवलेला मुद्दा मान्य करून मागच्या दाराने एन आर सी लागू करायला घेतला आहे हे या निर्बुद्धांच्या लक्षातच आलेले नाही. मोदीची जातिगणना सर्वसमावेशक आहे ,मुख्य मुद्दा दादा का, बाप का और तेरा कागज दिखा दो. एन आर सी कायदा यापेक्षा वेगळे काही सांगतच नव्हता. आधी हेच काम मोदीनी करायला घेतले होते त्यावेळी काँग्रेसने प्रचंड विरोध केला होता, पण मोदी हा चाणाक्ष मायावी माणुस आहे त्यांनी हीच मागणी राहुल गांधींच्या तोंडून वदवून घेतली. आता आपलेच दात आपलेच ओठ या न्यायाने गप्प बसणे आले.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अक्षरशः धम्माल सुरू आहे.“प्रियविहार” नावाच्या एका प्राचीन शिवमंदिरावर (हिंदु मंदिरावर) ताबा मिळविण्यासाठी थायलॅंड आणि कंबोडिया हे दोन बौद्ध देश एकामेकांशी युद्ध करत आहेत. आणि या हिंदुमंदिराच्या ताब्यासाठी भांडायला बौद्ध थायलॅंडला ख्रिस्ती अमेरिका पाठिंबा देतोय आणि बौद्ध कंबोडियाला कम्युनिस्ट चीन पाठिंबा देतोय. तिकडे कंबोडिया आणि थायलंड हे बौद्ध देश एका शिव मंदिरावरून भांडण करत आहेत. हास्यास्पद वाटू शकणारी ही सत्य घटना सध्या घडते आहे. थायलंड कडे अमेरिकेने दिलेली एफ 16 विमाने आहेत त्यांनी त्यांचा वापर सुरू करून कंबोडियावर हल्ला केला आहे. कंबोडियाने आपल्याकडील क्षेपणास्त्रे वापरुन प्रतिहल्ला केला आहे. दोन्ही देशात तुंबळ युद्ध पेटले आहे. ते म्हणजे उंचावर असणारे हे शिवमंदिर आमच्याच ताब्यात असायला हवे या एकाच मुद्दयासाठी. 1962 पासून हा विषय सुरू आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांनी या मंदिरावर थायलंडचा हक्क मान्य केला. परंतु तो निकाल कंबोडियाला मान्य नाही आणि म्हणून या मुद्द्यावर दोन्ही देशात वारंवार चकमकी घडत असतात. आता तर पूर्ण ताकदीने युद्धच पेटले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
दोन भाऊ एकत्र आणि आता महाराष्ट्रात भयंकर राजकीय उलथापालथ होणार... हे पेड मराठी मिडीयाचे दावे ऑलमोस्ट फोल ठरलेले आहेत. एकत्र येऊन काम करण्यापेक्षा ते दोघंजण एकमेकांना टाळतांनाच दिसत आहेत. आता पत्रकार " हे कट कारस्थान देवेंद्र फडणवीसांचंच आहे, उद्धव ठाकरेंना पुरतं संपवायचा हा मास्टर प्लॅन आहे " असे बोलत आहेत. राजकीय भुकंपांचं श्रेय बारामतीकडून आता नागपूरला कसं शिफ्ट झालं ?? तुम्हा सगळ्यांनाच आठवत असेल एक काळ होता जेव्हा महाराष्ट्रात बैल गाभण अशी बातमी आली तरी श्रेय साहेबांचंच असायचं, त्यांच्या धोरणांचं असायचं.... आणि आता ? सबकुछ अकेला देवेंद्र ??? उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली यात काहीच आश्चर्य नव्हतं. उद्धव ठाकरे सर्वेसर्वा झाल्यावर शिवसेनेचा कारभार कॉरपोरेट कंपनीसारखा सुरु झाला ग्राउंड लेव्हल ला, शिवसैनिकांशी कनेक्टेड एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. शिवसेनेप्रमाणेच अभंग वाटणारा एक प्रभावी पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस. पवार कुणाचेच ऐकत सतत डावलल्यामूळेच अजित पवार त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडत बाहेर पडले. हे प्रकार देवेंद्र फडणवीसांनी घडवल्याने ते पवार साहेबांपेक्षा अनेक पट वरचढ ठरतात. पत्रकार सुद्धा नाइलाजाने का होईना आता हे मान्य करू लागले आहेत.
🔽












Comments