अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चारकोपमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वितरण
सेवा हि संघटन!!!
====
भाजपा कामगार आघाडी, मुंबईच्या वतीने व धडक कामगार युनियनच्या सहकार्याने मुंबईत विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मोफत ‘छत्री’ वाटप करण्यात येत असून आज त्याच पार्श्वभुमीवर कांदिवली (प.) येथील चारकोप सेक्टर ७ मैदान येथे ज्येष्ठ नागरीकांना भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक अंकुर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी चे प्रताप बांगरे, अमित भोईटे, निळकंठ चमकीरी, सुवर्णा पवार, डेविड नाडर, सुनील पात्रे आदी नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा कामगर आघाडी मुंबई सहसचिव अभिजीत भोईटे यांच्या माध्यामातून आयोजित करण्यात आले होते यावेळी स्थानिक ‘धडक’चे पदाधिकारी जितेश शिंदे, राजू भौवणिक, राजेश यादव, राहुल सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
#BJP #BJPMumbai #BJPKamgarAghadi #AbhijeetRane #SevaHiSangathan #SeniorCitizens #FreeUmbrellaDistribution #Kandivali #Mumbai #DKU #Dhadak #DhadakKamgarUnion










Comments