top of page

desk of abhijeet rane

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

वनक्षेत्र वाढवताना नवीन संर्वंधन, अभयारण्ये, जैवविविधता स्थळ सरकारने राणा भीमदेवी थाटांत जाहीर केली.पण ती पुढे जतन करताना निधीची तरतूद लागेल ती तरतूद कंत्राटदारांना वनजमिनीवरील झाडांझुडपांची बेसुमार कत्तल करायला देऊन वन विरळ करून करणार का?



 

*ABHIJEET RANE (AR)*

मविआ सरकार नवीन अभयारण्ये निर्माण करीत आहेत.ऐकून समाधान वाटले. वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्या बिल्डरांची संध्याकाळी पूर्वीच्या महापौर बंगल्यावर होणारी गर्दी त्यामुळे कमी होईल अशी आशा बाळगून पर्यावरणप्रेमींना निश्चींत व्हायला हरकत नाही.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मेट्रो कारशेडवरून आरे जमिनीवरील झालेली झाडांची कत्तल पाहून विवळलेली मविआ बोरीवलीतील नॅशनल पार्कातील होणारी झाडांची कत्तल कोरोना काळांत थांबवू शकले नव्हते पण वनखात्यातील कागदांवर सुमारे दोन वर्ष नॅशनल पार्क बंद असल्याची नोंद आहे.


 

*ABHIJEET RANE (AR)*

नॅशनल पार्कात नवीन बसेस येणार आहेत.त्याही ईलेक्ट्रिकल एसी बस. त्यामुळे कान्हेरी गुंफेपर्यंत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटका़ंना तिथली सफर स्वस्तांत घडेल.पण त्यासाठी थोडा धीरही धरावा लागेल.सरकारी काम सहा महिने थांब या लालफितीत मंजुरी रखडली आहे.

 
 
 

Recent Posts

See All

🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात तुम्ही जे पेरता तेच उगवते हा जगाचा नियम आहे. भारतात गेली कित्येक वर्ष दहशतवाद पोसणारा पाकिस्तान आता त्याच आगीची...

Comentarios


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page