top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदें आल्यापासून केद्रींय मंत्री नारायण राणेंचे महत्व राजकीय वर्तुळात वाढलयं.चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडील गणपती दर्शनार्थ आलेले राणे आज सदा सरवणकरच्या प्रकरणानंतर त्यांच्याकडे दिसले.कालच सरवणकरांवर गोळीबार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राणेंची ही सरवणकरांची भेट बरेच काही रहस्यात्मक डावपेंचांचे भवितव्य सांगून जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागलायं.पण राणेंकडून खुलासा नाही.त्यामुळे राणेंच्याविषयी गैरसमज पसरू लागलेत. पक्षांतर्गत त्यांच्याविरूध्द कागाळ्या करणारे हात धुणार. त्यासाठी पूर्वानुभवावरून राणेंनीच स्वत:ला वादापासून अलिप्त राखणे त्यांच्या हिताचे आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केला आणि केद्रींय मंत्री नारायण राणे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले.लगेच केंद्राचे सरवणकरांना पाठबळ, भाजपचा पाठिंबा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ वैगरे आरोपांच्या फैरी झडायला लागल्यात. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची गोची होईल असा होरा विरोधकांनी वर्तवला आहे.पण पोलिसांच्या प्राथमिक वृत्तातच सरवणकरांवरील आरोपातले कच्चे दुवे उघड होणार आहेत. तसा सज्जड पुरावा विरोधकांकडेही नाही. फक्त आहे ते सरवणकरांचे पिस्तुलाचा तपासणी अहवाल. ते आजवर कुठे खरे ठरलेत. मोठमोठाले गँगस्टर्स हत्यांच्या आरोपातून सुटलेत. तर बॅलेस्टिक रिपोर्ट कोणता खरा मानायचा?हा प्रश्न न्यायालयात विचारला जाईल. आता बाळासाेबांची शिवसेना होती. ती त्यांच्या पुत्राला वारसदार म्हणून मिळालीच होती ना?तरीही एकनाथ शिंदे त्याच शिवसेनेचे दावेदार होऊन धनुष्यबाण चिन्ह मागतातच आहेत ना? न्यायालयात या बाबी उघड आहेत. पण तरीही न्यायदेवेतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेलीच आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

आमदार सदा सरवणकरांच्या गोळीबाराचा आरोप ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृहविभागाची लिटमस् टेस्ट आहे.यापूर्वी मविआ सरकार असताना किरीट सोमय्या, मोहित कंबोज, राणा दाम्प्यंत्य यांच्यावर झालेले हल्ले त्यांच्या मालमत्तेचे नुकसान ह्याबाबत मविआ सरकारने छीटपूट का होईना पण दोनचार दोषी शिवसैनिकांवर कारवाई केली होती.त्यामुळे बलाढ्य भाजपला विधीमंडळ सभागृहांत त्याविषयी तरी गदारोळ घालता आला नाही. पण आता जर सरवणकर स्वत:ची करामत दाखवू न शकता सुटले तरीही पोलिसांवरच शेकणारा हा गंभीर आरोप आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना मविआ सरकारसारखी माजी वनमंत्री संजय राठोडांसारखी क्लीनचिट देणे कठीण जाणार आहे.मुख्यमंत्रीपदावर असताना कोणत्याही आरोपांत न गु़ंतणारे फडणवीस विरोधकांच्या तावडीत विधीमंडळात वाचतांत की सुटतांत हे सर्व दादर पोलिसांमुळेच ठरणार आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

भाजपा,आरपीआय, मनसे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे़ंची शिवसेना हे सगळे मिळून मातोश्री, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर आरोप करत त्यांचे राज्यातील राजकारणातले महत्व वाढवताहेत.खरेतर या सगळ्यांना माहित आहे की, पुढील मनपा निवडणुकीत मुंबई व ठाण्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे वर्चस्व असलेल्या शिवसेनेची सत्ता मनपात नसणार.तरीही सगळे मिळून उध्दव ठाकरेंविरूध्दचा राग आळवत आहे. पण त्यामुळे विनासायास ॲडव्हर्स पब्लिसिटी ठाकरे परिवाराला मिळत आहे. परिणामी शिवसेनेच्या ज्या काही२५ ते ३० शिवसेनेच्या जागा निवडून येणारच आहेत. त्याचा फायदा या फुकटच्या मिळणाऱ्या पब्लिसिटीमुळे होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे हे विशेष.

3 views0 comments

コメント


bottom of page