*ABHIJEET RANE (AR)*
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या नीती आयोगाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री फोटोच्यावेळी शेवटच्या रांगेत दिसताच मुंबईत मविआ नेत्यांनी डंका पिटलां परंतु सर्वत्र चर्चा होण्याऐवजी समाजवाद्यांसारखीच ती विशीष्ट वर्गापर्यंत सिमीत राह्यली.
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *ABHIJEET RANE (AR)*
भाजपाचे ४८ लोकसभा मतदारसंघांचे लक्ष असल्याचे विधान रावसाहेब दानवेंनी करताच शिवसैनिकांच्या आनंदास पारावार राहिला नाही. लगेच सेनेतर्फे सचिन अहिर आले आणि त्यांनी ही तर सुरूवात आहे अशी कोटी करत शिंदेसेनेला हिणवायला सुरूवात केली.
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *ABHIJEET RANE (AR)*
शिवसैनिकांना दोनचार हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले.त्याचा फायदा सेनेला होईल का? भाजपने आरएसएसचे वलय सदस्यांच्या घरांत पसरवित घरातल्याच चार जणांना रोजगार दिला. तसे सेनेत नाही अन्यथा ईडी शिवसैनिकांच्या मागे कशाला लागली असती.
◆
🖋️ *ABHIJEET RANE (AR)*
राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे हे नेते हकालपट्टीनंतर शिवसेनेत कधीच परतले नाहीत.तीच पुनरावृत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची होणार. अन्यथा उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदेंना एकत्र आणायची शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर गुण्यागोविंदाने नांदताना दिसले असते.
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? ह्या प्रश्नाने शिंदेसेना व भाजपला चांगलेच सतावले आहे परंतु त्याचे उतर लवकरच होईल असे ते दोघेही प्रामाणिकपणे सांगत आहेत तरीही मिडीया त्यांचा पिच्छा सोडत नाही. वारंवार विस्ताराचेच घोंगडे त्यांचयामागे लावतहेत.
www.abhijeetrane.in
◆
🖋️ *ABHIJEET RANE (AR)*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरांनी पोलिसांचा कारभार मराठीतून करावा असा आदेश दिल्याने कवि कुुसुमाग्रजांचा आत्मा सुखावला. आयुक्ता़ंचा महाराष्ट्राच्या मायबोलीचा निर्णय स्वातंत्र्याच्या पवित्र वर्षातील देणगीच.
www.abhijeetrane.in
Comments