top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

राष्ट्रपतीपदावर द्रोपदी मुर्मू बसल्याचा अत्त्युच्च आनंद आम्हांलाही झाला.जेव्हा मूर्मूंसारखी व्यक्ती या उच्चपदी येते तेव्हा निवडणूक होणे अयोग्य बाब.पण त्या झाल्या. त्यात मूर्मू जिंकल्या.त्याबद्दल धडक कामगार युनियन,मुंबई मित्र व वृत्त मित्रवतीने जाहीर आभार.


*ABHIJEET RANE (AR)*

राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याने देशभरातील जनता आनंदली. पहिल्या आदिवासी महिलेचा योग्य सन्मान झाला.त्यामुळे माजी राष्ट्रपतीं अब्दुल कलमांच्यावेळीचे वाक्य आठवले. काही लोक पदांनी मोठी होतात.तर काहींमुळे पदांची शान वाढते.

*ABHIJEET RANE (AR)*

राष्ट्रपतीपदी द्रौपदी मूर्मू विराजमान झाल्यानंतर संपूर्ण भारतवासियांची मान अभिमानाने उंचावली.हे भाग्य मिळवून देणारी प्रभृत्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. तेव्हा ह्या लोकप्रिय नमोंपुढ्यात आम्ही नतमस्तक झालो आहोत. हे आम्ही तितक्याच गर्वाने जाहीर करतो.

*ABHIJEET RANE (AR)*

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम सणांना कोरोना नियममुक्त केले. कोरोनाचा जोर ओसरल्याने ही परवानगी मिळाली त्यामुळे सणप्रिय उत्सवी मंडळी़च्या आनंदाला पारावार राहिला नसून ते शिंदे-फडणवीसांना लाख-लाख धन्यवाद देताहेत.


*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा काढली.समाधानकारक प्रतिसाद त्यांना मिळाला. पण अशा निष्ठांनी होणार काय? शिवसैनिकांना तोडपाण्यात रस. तसे नसते तर ठाकरेंच्याच आरोपानुसार ईडीचे भयभीत बंड झाले असते का?आतातरी सैनिकांना ओळखा.

*ABHIJEET RANE (AR)*

ईडीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची चौकशी झाली. उद्याही होणार आहे. तेव्हा राज्यभर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणारच आहेत. पण न्यायालयाने आदेश दिलेल्या चौकशीत सोनियांची अटक नाही तर ईडीच्या रिपोर्टवर न्यायालयाचे आदेश असणार मग ईडीला लाखोल्या कशाला?

*ABHIJEET RANE (AR)*

वरळीतील सीजे हाऊसप्रकरणी शरद पवारनिष्ठा ठेवणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना ईडिने आग्रही निमंत्रण धाडलयं.त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता ईडि कार्यालय बंद, कोणावर कारवाई नाही, भाजप वॉशिंग मशीन ह्या सर्व टिकांना पूर्णविराम मिळालाय.

3 views0 comments

Comments


bottom of page