*ABHIJEET RANE (AR)*
काहीही झाले तरी चालेल परंतु शिवसेनेत परतायचे नाही भूमिका शिंदेंसेनेतील आमदारांनी घेतल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. आता त्यांची सारी मदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहे.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
भोंग्यापासून भाजपकडे आकर्षिलेल्या मनसेला लवकरच राज्याच्या नेतृत्वाची लॉटरी लागणार आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा गट मनसेत प्रवेश करणार आहेत. राज ठाकरेंनीही हिरवा कंदिल दिलाय.फक्त बुधवारच्या निर्णयानंतर ह्या घडामोडी अपेक्षित आहेत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फक्त भूमिका व त्यांनी बंडाचे पाऊल का उचलले एवढेच जाणून घ्यायचे असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर भेट घेण्यास तयार आहेत.अन्यथा हिंदुत्वासाठी भाजपबरोबर जाण्याची सर्व दारे त्यांनी बंद केली आहेत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
मुंबई मनपा निवडणुकांसाठी सर्व प्रमुख पक्ष विभागवार आढावा घेत आहेत.मात्र, शिवसेना शाखांत सैनिकांची संख्या रोडावली आहे.त्यामुळे सेनेकडूनआदित्य ठाकरेंच्या बैठकांचे नियोजन केल जातयं.पण पक्षप्रमुखांनी आश्वस्त केले तरच कामे करू अशी त्यांची भूमिका आहे.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
वैय्यक्तिक हिसंबध जोपासताना उध्दव ठाकरेंना जवळ करू नका अशी गळ कार्यकर्त्यांनी घातल्याने भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचा नाईलाज झाला असून त्यांना उध्दव ठाकरेंबरोबर सुरू असलेली समझोत्याची बोलणी अखेर बंद करावी लागणार आहेत.
◆
*ABHIJEET RANE (AR)*
संजय राऊतांची भूमिका शिवसैनिकांना पटेनाशी होताना दिसत आहे.शिंदेंसेनेतील बंडखोर आमदारांनी त्यांना लक्ष केल्यानंतर आज अभिनेत्री दिपाली सय्यदने मला कुणाच्या परवानगीची गरज नाही असा टोला राऊतांचा नामोल्लेख न करता हाणला.
Comments