top of page
  • dhadakkamgarunion0

desk of abhijeet rane

*ABHIJEET RANE (AR)*

अध्यक्षपदाच्या निवडीकरिता शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत अवतरले.सांताकृझहून थेट ताजमध्ये पोचले.मात्र वरळीहून रस्ता जातो सांगणारे व बंडखोर आमदारांना शेवटी मुंबईत यावेच लागेल हे सांगणारे शिवसैनिक शिंदेच्या बंडखोर आमदारांना नुसते बघतच राहिले.

 

*ABHIJEET RANE (AR)*

शिंदेसेना व भाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांसमवेत भाजपा आमदारांची संयुक्त बैठक झाली. परंतु बंडखोरांतही बंडखोर असल्याची उठाठेव शंकाखोर माध्यमांनी केल्यामुळे बैठीकीत विनाकारण तणाव जाणवला.

 

*ABHIJEET RANE (AR)*

विधानभवन परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बंडखोर आमदांरांची बडदास्त व्हिव्हिआयपींपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे.सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोहोबाजूंनी वेढल्यामुळे बंडखोरांना कोपऱ्यातील जागाही शोधताना नाकीनऊ येत आहे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर शिवसैनिक असल्याचा दावा करतात पण उध्दव ठाकरेनिष्ठ प्रतिज्ञापत्र देण्याची पक्षाची सूचना फेटाळतात. त्याबाबत शिवसैनिक नवल व्यक्त करताना हेच केसरकर बंडखोरीनंतर उध्दव ठाकरे आमचे नेते आहेत असे कसे सांगतात?

 

*ABHIJEET RANE (AR)*

मविआ सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली होती. तशीच खाती आश्चर्यकारकरित्या मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मंजूर होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार नको अशी शिंदेचीच भूमिका आहे.

 

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेने आमदारांपासून उपशाखाप्रमुखांपर्यंत उध्दव ठाकरेनिष्ठ शिवसैनिकाच्या प्रतिज्ञापत्राची नवी टूम काढली आहे. त्यासं मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काही बोलणे नको.परंतु अशी नवीन निष्ठावानांची शिवसेना पुढील निवडणुकांत पक्षप्रमुखांना तारणार का?

 

*ABHIJEET RANE (AR)*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कुशाग्र बुध्दीमत्ता शिंदेसेना सरकारला सदैव तारणारी आहे.भाजप आमदारांच्या संयुक्त बैठकीला शिंदेसेना गोव्याहून आल्याने फडणवीसांनी बैठक तासाभरातच आटोपती घेतली.त्यामुळे पुड्या सोडणाऱ्या माध्यमांचा हिरेमोड झाला.

3 views0 comments

Commentaires


bottom of page