top of page

desk of abhijeet rane

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेचे उदय सामंत गुवाहटीला चार्टर्ड प्लेनने पोचले. शेवटचा अपेक्षित धक्का मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना मिळाला. त्यामुळे त्यांच्यासोबत फक्त शिवसैनिकच आहेत. पुढे तेही राहतात की नाही ही शंका आहेच. नारायण राणेच्या वाणीप्रमाणे उध्दव ठाकरे व मिलींद दोघेच शिवसेनेत उरतात.

*ABHIJEET RANE (AR)*

उदय सामंताच्या धक्क्याने शिवसेनेऐवजी मिडीयाच जास्ती हादरला.काल रात्री उशिरापर्यंत मिडीयातील मित्रांसोबत असतानाही सामतांनी कोणाला ताकास तूर लागू दिला नाही. इतके आतल्या गाठीचे आमदार कोकणवासियांनी प्रथमच बघितल्याने तेही हळहळले.

*ABHIJEET RANE (AR)*

राजकारण्यांचे बरं असत.मिडीयाद्वारे परस्पर बोला. कोणीही आक्षेप घेत नाही.अब्रुनुकसानीचे दावे केले जातात त्यातही माफी मागितली जाते व दावा निकालांत निघतो याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे राजकीय नेते बिनधास्त उचलली जीभ लावली टाळाला प्रकार करतांत.

*ABHIJEET RANE (AR)*

केद्रींय मंत्री रावसाहेब दानवेंनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना एका समारंभात चांगलेच खिजवले. फक्त दोनतीन दिवसच राहिलेत काम काढून घ्या. कदाचित नंतर त्याचा उपयोग होईल असाही टोला हाणल्याने टोपे नक्कीच घायाळ झाले असणार यात शंका नाही.

*ABHIJEET RANE (AR)*

उध्दव ठाकरे मविआसाठी ठाम आहेत तर एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपबरोबर युतीसाठी हट्टून बसलेत. दोघानांही सुवर्णमध्य नकोय. त्यामुळे राज्याचे सरकार अस्तित्वात आहे की नाही? असे जनतेनेच ह्या राज्यकर्त्यांचे गळे पकडून विचारण्याची वेळ आणी आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

राज्याच्या गुप्तवार्ता शाखेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार समाधानी नाहीत. शरद पवारा़ंच्या घरावरील हल्ल्यानंतर तर त्यांनी ह्या विभागाविषयी उच्चपदस्थांकडे नाराजी व्यक्त केली. त्यातच आता मंत्री, आमदारांचे पलायन होऊन बंड झाले. त्यामुळे पुन्हा ते भडकलेत.

*ABHIJEET RANE (AR)*

देवेंद्र फडणवीसांनी कालही दिल्लीवारी केली. एकनाथ शिंदेच्या बंडखोरांचा गट त्यांना मिळाल्यामुळे दिल्लीतील नेत्यांना माहिती देणे क्रमप्राप्त होते. त्यानंतरही पहाटेच्या सरकारसारखी स्थिती नशिबी आलीतर हसे होईल. त्यामुळे कल्पना दिलेली बरी.

 
 
 

Recent Posts

See All

🖋️ अभिजीत राणे लिहितात

🖋️ अभिजीत राणे लिहितात तळागाळातील कार्यकर्त्याला मोठे करण्याचे भाजपाचे धोरण त्यांना सातत्याने तरुण व तडफदार नेत्यांची फौज तयार करून देते...

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page