९वा आनंद संगीत उत्सव संगीताच्या उत्कृष्टतेची अविस्मरणीय संध्या
मुंबई | दिवंगत दिग्गज गायक पं. श्री आनंद कुमार सी. यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ Soul Mantra Music Foundation आणि शैलेंद्र भारती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९व्या आनंद संगीत उत्सवाला भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या सामाजिक व कामगार क्षेत्रातील योगदानाबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पं. श्री आनंद कुमार सी. यांच्या समृद्ध संगीत वारशाला समर्पित हा संगीत सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात त्यांचे सुपुत्र तथा भक्ती सम्राट शैलेंद्र भारती यांच्या भावपूर्ण आणि भक्तिरसपूर्ण गायनाने झाली. त्यांच्या सादरीकरणातून भावना, भक्ती आणि संगीताची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळाली.
यानंतर पद्मश्री अली आणि पद्मश्री गनी यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने रसिकांना भारावून टाकले. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाची सांगता पद्मश्री हेमंत चौहान यांच्या उत्कृष्ट भक्तिसंगीताने झाली आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
या संगीत सोहळ्यात तबला वादक देवेंद्र भारती यांनी सर्व गायकांना उत्कृष्ट तबला साथ दिली. त्यांच्या तालावरील प्रभुत्वाने आणि संवेदनशील संगीतसाथीने प्रत्येक सादरीकरण अधिक प्रभावी आणि समृद्ध केले.
यावेळी बोलताना कामगार नेते अभिजीत राणे म्हणाले,
“संगीत ही केवळ कला नसून ती संस्कृती, संस्कार आणि भावनांना जोडणारी शक्ती आहे. पं. श्री आनंद कुमार सी. यांनी आपल्या अद्वितीय संगीत साधनेतून निर्माण केलेला वारसा आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे. आनंद संगीत उत्सवाच्या माध्यमातून हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा सांस्कृतिक आणि संगीत परंपरांना समाजाने कायम प्रोत्साहन दिले पाहिजे.”
या प्रसंगी अभिजीत राणे यांनी कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाचे कौतुक करत आयोजक Soul Mantra Music Foundation आणि शैलेंद्र भारती यांचे अभिनंदन केले. पं. श्री आनंद कुमार सी. यांचा संगीतवारसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचत राहावा आणि आनंद संगीत उत्सवाची ही सुंदर परंपरा अखंड सुरू राहावी, अशी शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केली.
संगीत, भक्ती आणि भावनेने भारलेल्या या अविस्मरणीय सोहळ्याला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आनंद संगीत उत्सवाची ही संगीतमय परंपरा भविष्यातही अशीच समृद्ध होत राहो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis for Maharashtra Ameet Satam Ravindra Chavan Bharatiya Janata Party (BJP) Vinod Shelar BJP Narendra Modi Nitin Nabin Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Kripashankar Singh Sunil Rane Murji Patel Parag Shah Asian News International (ANI) Ganesh Naik Mangal Prabhat Lodha







Comments