top of page

हे अजून काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येत नाही काय?

dhadakkamgarunion0

*@ABHIJEETRANE(AR)*

ईडीची नोटीस आली म्हणून कुणी घाबरत नाहीत तर चौकशी दरम्यान आवश्यक खुलासे करतात आणि 90% लोकांवर अटक वगैरे कठोर कारवाई होत नाही पण ईडीची नोटीस आर्थिक गुन्हेगारीचा जो बदनामीकारक डाग चौकशीनंतर त्या व्यक्तीवर कायमचाच बसतो आणि विरोधक एकूणच सर्व व्यवहार संशयास्पद ठरवतात व जनमानसात प्रतिकूलता आणि अविश्वास निर्माण होतो तो घातक असतो. एकाद्या स्त्रीने कुणा नेत्यावर किंवा कुठल्या पुरूषावर विनयभंग किंवा बलात्काराचा नुसता आरोप जरी केला तरी कोर्टात शहानिशा होऊन गुन्हा सिद्ध किंवा असिद्ध होण्यास अनेक वर्ष जातात पण पण पण नुसता आरोप केला तर जरी त्यावेळेस प्रथमदर्शनी देखील सिद्ध नाही झाला तरी त्या नेत्यांवर राजीनामे देण्याची वेळ येते, व्यक्तीचे सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त होते याची हजारो उदाहरणे आहेत. काहीसे असेच ईडी नोटीस नंतर घडते. आरोप सिद्ध होईल किंवा नाही, अटक सहसा संभवत नाही पण आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार याचा कलंक बट्टा डाग कायमचाच लागतो आणि 'कुछ डाग अच्छे नही होते ' त्यातला एक ईडी चौकशी हा आहे. ईडी आडवळणांनी 'मातोश्री'कडे निघाली आहे तर सीबीआय भुयारी गटारातून 'युवराजां'पर्यत पोचता येते का याचा शोध घेत आहे. वर्षा संजय राऊत ही सुरुवात आहे शेवटचा टप्प्या 'मातोश्री' असणार याचा हा सूचक इशारा आहे.


 

*@ABHIJEETRANE(AR)*

अशोक चव्हाण म्हणाले की:

शिवसेना युपीए चा घटक पक्ष नाही, फक्त महाराष्ट्रात मित्र पक्ष आहे, तेव्हा संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करीत, शरद पवार यांना युपीए चे प्रमुख पद द्यावे, अशी सूचना करणे, अनावश्यक आहे"

शिवसनेला राहुल गांधी यांचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व मान्य नाही नाही नाही

आणि मोदी - शहांना शह द्यायचा असेल तर शरद पवार यांच्यावर युपीए फक्त नव्हे तर..

संपूर्ण देशातील विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी..

असे शिवसेनेचे म्हणजेच..

शिवसेनेचा "मेंदू" असलेल्या संजय राऊत यांचे..

आणि शिवसेनेचे "-हुदय" असलेल्या उद्धव ठाकरे यांचे मत आहे..

आणि राऊत यांच्या मुखातून बाहेर पडणा-या उद्गारांचे उद्गाते शरद पवार साहेब आहेत..

हे जर अशोक चव्हाण यांच्यासह गांधी परिवाराच्या वेळीच लक्षात येईल तर..

आता महाआघाडी सरकार मधून बाहेर पडून काँग्रेसचे अस्तित्व अस्मिता स्वाभिमान आणि वेगळेपण टिकवण्याची वेळ आली आहे..

हे त्यांच्या लक्षात येईल.

शिवसेना व राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात काँग्रेसला जीवदान द्यायला निघाले नसून काँग्रेसचा जीव घ्यायला निघाले आहेत..

हे अजून काँग्रेस नेत्यांच्या लक्षात येत नाही काय?

अहो, महोदय..

तुम्ही ज्याला तुमची 'मिरवणूक' समजत आहात ती प्रत्यक्षात 'धिंड' आहे..

ज्या 'खुर्ची'वर तुम्ही बसला आहात..

ती 'वरून' 'सत्ते'ची दिसत असली तरी..

प्रत्यक्षात फाशी देण्यासाठी वापरली जाणारी 'इलेक्ट्रिक चेअर' आहे..

हे ओळखून..

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात..

तुम्ही सत्तासुंदरीच्या "हनी ट्रॅप" मधून लवकरात लवकर सुटका करून घ्या..

अन्यथा तुमच्या राष्ट्रीय नेत्यांचा अपमान अवहेलना विडंबना..

शिवसेना व राष्ट्रवादी नेते करतात..

म्हणून कांगावा करून दुटप्पीपणा करू नका !


 

*@ABHIJEETRANE(AR)*

पार्थ पवार पंढरपूर विधानसभा मतदारसंघात उभे राहिल्यावर खरा पेचप्रसंग भाजपा पुढे उभा राहणार आहे कारण..

विरोधक म्हणून पार्थ विरोधात उमेदवार तर द्यावा लागेल पण पार्थ पराभूत होण्यापेक्षा निवडून येण्यात भाजपाचा राजकीय फायदा अधिक आहे कारण विधानसभेत शरद पवारांचे लाडके रोहित पवार आणि अजितदादांचे प्रिय पार्थ समोरासमोर येतील आणि शरद पवार व अजितदादा यांचा वरून शांत पण आतून तप्त असा संघर्ष पुढील पिढीच्या गृहकलहात सभागृहात रूपांतरित झालेला असेल / दिसेल. पार्थ पवार बद्दल दुर्भावना असेल किंवा नसेल पण सद्भावना "साहेबां"च्या मनात नाही हे सूचित करणारी अनेक उदाहरणे आहेत. अशावेळेस पार्थ पवार विधानसभेत आल्याने जर रोहित पवार यांना शह बसणार असेल तर भाजपा उमेदवार निवडून येण्यापेक्षा पार्थ निवडून येणे भाजपाला सोयीचे आहे. शिवाय आज ना उद्या जेव्हा केव्हा महाआघाडी सरकार कोसळेल तेव्हा शरद पवार महाआघाडीतील घटक पक्षांनी एकत्र विधानसभा निवडणुका लढवाव्यात असा आग्रह धरतील पण अजितदादा 100% राष्ट्रवादीने स्वबळावर स्वतंत्र निवडणूक लढवावी आणि निवडणुकी नंतर सत्ता कुणासोबत जाऊन स्थापन करायची हे ठरवावे असा ठाम आग्रह धरतील आणि मध्यावर्ती विधानसभा निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नाही तर शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीने भाजपा सोबत जावे असा निकराने प्रयत्न करतील व यावेळेस गेल्या वेळेस 80 तासाच्या सरकारात फुटले तसे आमदार फुटणार नाहीत याची काळजी शरद पवार यांच्या इच्छा किंवा अनिच्छा याची पर्वा न करता करतील असा विश्वास भाजपाला आहे आहे आहे त्यामुळेच दुबळा उमेदवार भाजपा देईल आणि पार्थ पवार निवडून येतील अशी व्यवस्था करील असा माझा अंदाज आहे. पार्थ पवार यांच्या आमदारकीच्या मार्गातील अडथळा भाजपा नाही नाही नाही मग कोणता आहे? तर तो म्हणजे शरद पवार 'पक्षाचा निर्णय' या नावाखाली पार्थ पवार यांना उमेदवारीच नाकारतील.. असे झाले तर अजितदादा पवार काय करणार?हा प्रश्न पार्थ पवार काय करणार यापेक्षा महत्वाचा असेल!!


 

*@ABHIJEETRANE(AR)*

लोकांच्या वैयक्तिक कौटुंबिक सार्वजनिक सामूहिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक अध्यात्मिक क्रिडा आणि कला क्षेत्रातील जीवनावर कोरोनाच्या भयगंडातून आणि सरकार प्रतिबंधक व उपचार उपाय योजनात कमी पडत असल्याच्या न्यूनगंडातून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांची सलग आठ महिने जी कोंडी केली आणि अजूनही.. आजही.. नववर्षाच्या दिवशी देखील करीत आहेत या विषयी जनसामान्यांना वाटणारा क्रोध प्रक्षोभ चीड संताप असंतोष खदखद सूडभावना कोणत्या स्वरूपात कधी केव्हा कुठे कशी ज्वालामुखीचा स्फोट होऊन उकळत्या लाव्हारसासारखा उफाळून येईल याची जाणीव आशंका संभाव्यता दुर्देवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुणाही मंत्रिमंडळातील सहका-याला दिसत नाही.. ! एवढेच सांगेन की महाआघाडी सरकारला या आठ महिन्यांपासून लादलेल्या अघोषित आणीबाणीचे प्रायश्चित्त तर महाराष्ट्रातील जनता देणारच देणार फक्त निमित्त काय होते ते नियती निश्चित करील!!! अनेकदा पश्चाताप करून पापाचे परिमार्जन होत नाही प्रायश्चित्त आपण घ्यावे लागते किंवा जनता देते!


6 views0 comments

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page