top of page
  • dhadakkamgarunion0

"सावध" म्हणाल की "डरपोक" ?

@ABHIJEETRANE (AR)

वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल्सनी सरकारच्या संदर्भात विरोधी पक्षाची भूमिका बजावावी असे म्हणतात पण सध्या अपवाद वगळता बहुतेक दैनिकेआणि न्यूज चॅनल्स ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात पण महाआघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि व्यक्तीशः पवार साहेबांच्या बाजूने भूमिका घेताना दिसतात. भाजपाला विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीया वर महत्व दिले जात नाही किंबहुना दखलही घेतली जात नाही पण पण पण.. विशेष वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीगत पातळीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर या दोघांच्या सरकारवरील आरोपांना, टीकेला शक्य आणि आवश्यक होते तेवढी प्रसिद्धी जरूर दिली जाते. बाकी चंद्रकांत पाटील, नारायण राणे, गिरीश महाजन, नितीन गडकरी, किरीट सोमय्या, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे , सुभाष देशमुख इत्यादी भाजपा नेत्यांना महत्व द्यायचे नाही किंबहुना त्यांची जमेल तेव्हा खिल्ली उडवायची अशी मराठी प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीयाची पाॅलिसी दिसते. विरोधी पक्षात राज ठाकरे यांना त्यांच्या उपयुक्तता आणि उपद्रव मूल्यांच्या तुलनेत मराठी मिडीया अतिरिक्त आणि अवाजवी महत्व देतो असे माझे निरिक्षण आहे. "प्रकाश आंबेडकर यांना मोठे करू नका" हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वश्रेष्ठ नेत्यांचा आदेश, संदेश मराठी मिडीया प्रामाणिकपणे पाळताना दिसतो. मराठी मिडीयावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पवार साहेब आणि त्याखालोखाल भाजपा म्हणजे देवेंद्रजींचे वैयक्तिक वर्चस्व जाणवते. शक्य आणि आवश्यक असूनही उद्धवजींना "सामना" व्यतिरिक्त इतर कोणत्याही मराठी प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयात आपले हितचिंतक, समर्थक असावेत यअसे अजिबात वाटत नसावे इतक्या तुसडेपणाने , मख्खपणाने , अलिप्तपणाने उद्धवजी मिडीयावाल्यांशी वागतात. स्वभावाला औषध नसते हेच खरे!!

www.abhijeetrane.in


 


@ABHIJEETRANE (AR)

महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला तुम्ही कोरोना संदर्भात टाकत असलेल्या पावलांमुळे "सावध" म्हणाल की "डरपोक" ? "सावध" सरकार प्रतिबंधक आणि उपचारात्मक उपाय योजनांची पूर्वतयारी - आखणी आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारा अंमलबजावणी करण्याची सिद्धता करते तर "डरपोक" सरकार स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी आणि निष्काळजीपणा झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरून निर्बंधांवर निर्बंध आणखी कडक करून वातावरणात भयभीतता आणि हतबलतेची भावना पसरवून राज्याचा कैदखाना करून टाकते.. ! मागील दहा महिन्यांचा महाआघाडी सरकारचा कोरोना उपाययोजनांचा अनुभव भयभीत, डरपोक आणि आत्मविश्वास नसलेल्या हताश निराश निर्नायकी निष्क्रीय निष्रभ नाकर्तेपणाचा आहे त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येणार ही बातमी या जाणीवेने काळजाचा थरकाप उडवते की म्हणजे हे भयभीत शासन आणि मानसिक खच्चीकरण झालेले प्रशासन पुन्हा घड्याळाचे काटे उलटे फिरवणार, लाॅकडाऊनच्या धमक्या देत निर्बंध आणखी कडक करणार, निर्दय कारवाया करीत लोकांचे रोजगार हिरावून घेणार, उद्योग धंदे व्यापार व्यवसाय सुरू होता होता पुन्हा एकदा त्यांच्यावर घाला घालणार आणि लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन कोंडीत पकडून जीवन उद्ध्वस्त करणार.. कोरोना परवडला पण भयकंपित महाआघाडी सरकारच्या उपाय योजना नकोत या मनःस्थितीत महाराष्ट्र आहे. विरोधी पक्ष आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडीया वरील तीव्र विरोध ही आणीबाणी काही प्रमाणात रोखू शकतो. उद्धवजींच्या घबराटीला पवार साहेबांनी, अजितदादांनी आवर घातला तरी हे लाॅकडाऊनचे संकट टळू शकेल. अन्यथा शिवशाहीचे कठोर कारवाई शिक्षा निर्बंधांच्या हुकुमशाहीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजींनी स्वतःची मानसिक तयारी कधीच केली आहे!

www.abhijeetrane.in
8 views0 comments

Comments


bottom of page