सेवा हीच संघटनाचा संदेश; भाजपा कामगार आघाडीचा रिक्षाचालकांसाठी उपक्रम
- dhadakkamgarunion0
- Jul 8
- 2 min read
📰 कृपया प्रसिध्दीसाठी...
-------
◆ सेवा हीच संघटनाचा संदेश; भाजपा कामगार आघाडीचा रिक्षाचालकांसाठी उपक्रम
◆ विनोद शेलार यांच्या हस्ते छत्री वाटपाचा शुभारंभ
◆ कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांना मोफत छत्र्यांचे वाटप,10 हजार छत्र्या वाटपाचे लक्ष्य
=====
मुंबई : भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून आज भाजपा कामगार आघाडी मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनात रिक्षा चालकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा मुंबई सरचिटणीस विनोद जी शेलार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.
भाजपा मुंबई व धडक कामगार युनियन यांच्या संलग्नपणे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे सभासद असलेले विविध स्टँडचे रिक्षा चालक उपस्थित होते. ज्यामध्ये लोखंडवाला सर्कल कमिटी, सॉलिटेयर पार्क कमिटी, रामगड कमिटी, विलासराव देशमुख गार्डन कमिटी, गोकुळ गॅलेक्सी कमिटी, आदी ‘धडक’च्या स्टँडच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.कामगार नेते अभिजीत राणे यावेळी बोलताना, धडक कामगार युनियनच्या माध्यमातून दरवर्षी सातत्यपुर्ण हा कार्यक्रम प्रत्येक स्टँडवर राबवला जातो. आज या कार्यक्रमाचा शुभारंभ व उद्घाटन सन्मा. विनोद जी शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले. यापुढे भाजपा कामगार आघाडी, मुंबईच्या माध्यमातून मुंबईतील ‘धडक’च्या सर्व स्टँडवर छत्री वाटपाचे कार्यक्रम सुरु होतील. दरवर्षी आम्ही ५ हजार छत्र्या मुंबईत विविध स्टँडवर वितरीत करतो... यावेळी तो आकडा दहा हजारांवर नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.विनोद शेलार यांनी यावेळी बोलताना, भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुका लढवणारा पक्ष नाही, तर समाजाशी सतत जोडलेला राहून जनसेवा करणारा पक्ष आहे. आज पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्री वाटप करण्यामागे केवळ वस्तू देण्याचा हेतू नसून, संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या १५ वर्षांत 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्रानुसार देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवा, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटक यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, डिजिटल क्रांती, आर्थिक सुधारणांमुळे भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक सक्षम झाली आहे.आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आधुनिक महामार्ग, वंदे भारत रेल्वे, मेट्रो प्रकल्प, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, पीएम किसान, उज्ज्वला योजना यांसारख्या योजनांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियामुळे भारत नव्या युगातील आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते 'सेवा हीच संघटना' या भावनेने वर्षभर समाजात कार्यरत असतात. छत्री वाटपासारखे उपक्रम हे त्याच सेवाभावाचे प्रतीक आहेत. असे यावेळी ते म्हणाले.
धर्मेंद्र पाल, राजकुमार सरोज, गार्गी रॉय,अभय झा, नामदेव चव्हाण, भारती भेंडे, रवी बनसोडे, फरीद शेख, वाहिद शेख आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन जाधव, बबन आगडे, सत्यविजय सावंत आदींनी मेहनत घेतली.
अभिजीत राणे यांचे जनसंपर्क




























Comments