ABHIJEETRANE (AR)
शाळा उघडताना पालकांकडून पाल्यांना शाळेत पाठविण्यास स्वतःच्या जबाबदारीवर संमती देत असल्याचे पत्र घेतले जाणार आहे. हा एक सरकारने धूर्तपणाने लावलेला सापळा आहे. मुलांना कोरोना झाल्यास सरकार त्यांची जबाबदारी नाकारणार हे स्पष्ट आहे. उपचाराचा खर्च किंवा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार बांधील असणार नाही. शाळांनी योग्य पूर्वतयारी किंवा खबरदारी घेतली नाही तरी शाळा नव्हे तर पालक मुलांना कोरोना झाल्यास जबाबदार ठरतील कारण त्यांनी तसे लिहून दिलेले असेल. आता पालकांनी विचार करायला हवा की असे संमती पत्र लिहून द्यायचे की नाही?
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
शिक्षण संस्था चालकांना शाळा सुरू झाल्याचा आभास निर्माण केल्याशिवाय पालकांकडून अडवणूक करून फी उकळता येणार नाही म्हणून सरकारवर दबाव आणून शाळा सुरू करण्यासाठी संस्था चालक प्रयत्नशील आहेत पण पण पण शिक्षक किंवा विद्यार्थी आणि पालक कोरोनाची रिस्क घ्यायला तयार नाहीत. यापुढील काळात संघर्ष असा होणार आहे की संस्था चालक म्हणणार "आम्ही शाळा सुरू केली आहे, तुम्ही या किंवा नका येऊ, फी द्या" शिक्षक म्हणणार "थकित पगार आधी द्या तर कामावर येतो" पालक म्हणणार "शाळा बंद असलेल्या काळाची फी घेऊ नका, आम्ही ऑनलाईन शाळांची फी देखील देणार नाही " सरकार म्हणणार "शाळांना अनुदान देण्यासाठी सरकार कडे पैसे नाहीत, शाळांनी फी आणि देणग्या मिळवून हवे तर शाळा चालू ठेवाव्यात किंवा बंद कराव्यात. " शिक्षण संस्था थेट जून 2021 मध्ये नाॅर्मल होतील तोपर्यंत शाळा " बंद आणि चालू " चा घोळ असाच कोरोनाच्या चढउतारानुसार चालू राहील असा माझा अंदाज आहे.
www.abhijeetrane.in
@ABHIJEETRANE (AR)
कोरोना प्रतिबंधक लस आली म्हणून कोरोना आटोक्यात आला असे होणार नाही म्हणजे नाही हे उमजते आहे का तुम्हाला? 135 कोटी भारतीयांना लस टोचण्यासाठी 2024 साल उजाडेल आणि दिलेली लस जन्मभर पुरेल इतकी सक्षम असणार नाही त्यामुळे दर तीन किंवा सहा किंवा बारा महिन्यांनी रिपीट करावी लागेल हे तज्ञांचे म्हणणे लक्षात घेता लसीकरण आणि कोरोनाचा संसर्ग या दोन्ही गोष्टी सतत समांतर यापुढे कायम रहाणार हे गृहीत धरून सरकारने आणि व्यक्तीशः आपण यापुढील काळातील आपल्या जीवनाची वाटचाल ठरवावी लागेल असे मला वाटते. एकदा कोरोना झाला की पुन्हा होत नाही ही दिलासादायक बाब देखील आता शास्त्रज्ञांनी निकालात काढली आहे आणि एकदा कोरोना झाला आणि बरा झाला तरी तीन ते सहा महिन्यात त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकार शक्ती संपुष्टात येते आणि परत कोरोना होऊ शकतो इतकेच नव्हे तर तो अधिक घातक असतो हे जाहीर झाल्याने कोरोना मुक्त झालेल्यांच्याही भयकंपित आणि शंकीत मनाला क्लेश खंत खेद वेदना आणि यातना होऊ लागल्या आहेत. मृत्यूची टांगती तलवार अदृश्य स्वरूपात सदैव प्रत्येकाच्याच डोक्यावर असते .. पण कोरोनामुळे आता ती मृत्यूची टांगती तलवार अदृश्य ऐवजी दृश्य स्वरुपात अवतीभवती स्वैर घात आघात अपघात घातपात प्रतिघात करीत फिरताना दिसते आहे.. हा मित्र कोरोनाने गेला .. तो मान्यवर कोरोनामुळे अचानक गेला.. हा तरुण आरोग्य संपन्न होता तरी गेला .. तो वयोवृद्ध होता म्हणून कोरोनातून वाचू नाही शकला .. जगात पाच कोटी लोकांना कोरोना झाला.. त्यातले पंचवीस लाख मेले.. भारतात एक कोटीचा आकडा पार केला.. दोन लाख मृत्यू पावले .. मुंबईत कोरोनाचे थैमान.. हे सारे टीव्ही वर सतत सतत पहायचे .. वृत्तपत्रात तेच वाचायचे.. आपसात कोरोनावरच बोलायचे .. कशी ही परिस्थिती निर्माण झाली.. काय मनःस्थितीत आपण जगतो आणि क्षणाक्षणाला कणाकणाने तनामनातून मरतो आहोत.. पृथ्वीचा अंत झाला तरी ती अनंत असणार आहे.. पण आपण केव्हा कसे कुठे काय असणार ह्याची अनिश्चितता मृत्यू निश्चित आहे ही जाणीव अधिक तीव्र करीत आहे.. जगण्याचा जिथे भरवसा नाही आणि मरण्याचा मुहूर्त ठाऊक नाही तिथे जगण्यात मरण्याचा अनुभव आपण रात्रंदिवस घेतो आहोत.. कसले सुख ! कसले दु:ख ! सुखदुःखाच्या पलिकडचा माणूस म्हणून एक तटस्थ अलिप्त एकटेपणा एकाकीपणा सर्वांमध्ये असूनही येतो आहे.. जणू प्रत्येक माणूस स्वतःचे कर्म धर्म संयोग आणि नियती असलेले "बेट" होतो आहे. मी माझे मला तर निरर्थक ठरतेच आहे पण आपण आपले आपल्याला असेही काही कोरोनाने शिल्लक ठेवले नाही.. हे या क्षणाचे सत्य आहे!!
www.abhijeetrane.in
Comentarios