राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे अध्यक्ष सन्मा. शरद पवार साहेब यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित शोकसभेस धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. अभिजीत राणे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना, शरद पवार साहेबांमुळे माझे त्यांचे मागील २५ वर्षांपासून संबंध होते त्यांनी लहान मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम केले. राजकीय वाटचालीत मला अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन लाभले. असे यावेळी ते म्हणाले.



Comments