संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या संतसृष्टीचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
- dhadakkamgarunion0
- Jun 20
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या संतसृष्टीचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडमुखवाडी, पुणे येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्मित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्प व संतसृष्टीचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी फडणवीस म्हणाले की, 'संतसृष्टी व ऐतिहासिक भेटीच्या समूहशिल्पाच्या उदघाटनाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.' एकूण ३० कोटी ६९ लाखांच्या निधीतून थोरल्या पादुका, वडमुखवाडी, चऱ्होली (पुणे) येथे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीतील वारकरी संप्रदाय व महान संतांची माहिती मिळावी या उद्देशाने संतसृष्टी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप या ठिकाणी साकारण्यात आले आहे. या ठिकाणी मिश्र धातूपासून तयार केलेली २५ शिल्पे आहेत, ज्यामध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि इतर २० वारकरी समाविष्ट आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments