top of page
  • dhadakkamgarunion0

शिवसेनेतील मित्रवर्य आत्ताच मला म्हणाले की...

🖋️ ABHIJEET RANE (AR)

शिवसेनेतील मित्रवर्य आत्ताच मला म्हणाले की "अभिजीत, तू पवार साहेबांची खेळी समजून घे. त्यांनी चातुर्याने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्धवजींवर सोपवला आहे कारण "आज" जो न्याय उद्धवजी अनिल देशमुख यांना लावतील तोच "उद्या" त्यांना अनिल परब यांच्यावर आरोप होतील तेव्हा लावावा लागेल आणि उद्धवजींना ह्याची जाणीव, कल्पना असल्यामुळे ते शरद पवार साहेबांकडून सूचित निर्णय घेतील. म्हणजे उद्धवजी राजीनामा स्वतः मागणार / घेणार नाहीत तर शरद पवार साहेब घेतील तो निर्णय अंमलात आणतील."

खरे आहे.!मला पटले. तुम्हाला.. ?

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

मला सांगा वणव्यासारखे पेटलेले संजय राठोड आणि पूजा चव्हाण प्रकरण आता आग विझली आणि राख उरली अशा अवस्थेत नाही का ? अद्याप साधा एफ आय आर नाही. पण कोण बोलते आहे काय ? ज्या भाजपाने आकाश पाताळ एक केले ते तरी कुठे आहेत ? उद्धवजींनी अखेर पर्यंत राजिनामा घेण्यात टाळाटाळ केली होती ती आणखी थोडी लांबवली असती आणि दरम्यान सचिन वाझे प्रकरणाचा ज्वालामुखी फुटला असता तर संजय राठोड प्रकरण आपोआप मागे पडले असते. राठोडांचे मंत्रीपद देखील वाचले असते. आता मला विचारा.. सचिन वाझे प्रकरणात "असेच" होणार काय ? अनिल देशमुखांचा राजीनामा आत्ता नाही म्हणजे कधीच नाही. परमवीर सिंग यांच्यावर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप "बूमरँग" होतील असा गौप्यस्फोट कुठल्याही क्षणी अपेक्षित आहे जो त्यांनी केलेल्या आरोपातील विश्वसनीयता नष्ट करील. मग काही काळानंतर आग विझेल .. राख उरेल.. राजकीय धुळवडीसाठी राख पुरते.. आरोपांचे "पेटते बोळे" कायम कुणी कुणावर फेकत नाहीत. शेवटी जो आग लावतो त्यालाही धग आणि चटके बसतात हे धूर्त राजकीय नेत्यांना ठाऊक असते. राजकारणातील मातब्बर आणि मुरब्बी नेते विरोधकाला संपूर्ण संपवत नाहीत तर विकल, दुर्बल करतात कारण या मातब्बर नेत्यांनाही ठाऊक असते की जोपर्यंत विरोधातील पक्ष व नेते जिवंत आणि ज्वलंत आहेत तोवरच आपल्याला आपल्या पक्षात किंमत आहे कारण लढण्याची हिंमत आणि हिकमत आपल्या पक्षात आपल्यातच आहे. "अनिल देशमुख" ही "व्यक्ती" येते-जाते .. "प्रवृत्ती" चिरंतन असते.. नाव आडनाव वेष परिवेष बदलून ती मंत्रीमंडळात "अमर" असते.. अन्यथा आजवर मंत्र्यांचे अनेकानेक राजीनामे प्रत्येक राजवटीत कसे झाले असते?

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

परमवीर सिंग यांचे भाजपा नेते मेघे व्याही आहेत याचा उल्लेख करणा-यांसाठी अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेली नोंद: महाराष्ट्रातील 288 सर्व पक्षातील (भाजपा / काँग्रेस / शिवसेना.. धरून पण रिपब्लिकन नेते वगळून) आमदारांपैकी 38 आमदार मा.शरद पवार साहेबांचे नातेसंबंधातील आहेत. पण राजकीय सख्य आणि वैयक्तिक नातेसंबंध यांची गल्लत 'ते'ही करीत नाहीत आणि 'हे' करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.. अजितदादा किंवा पार्थ पवार नाही का .. "साहेबां"च्या संदर्भात.. कधी "हम साथ साथ है" तर कधी "हम आप के है कौन?" अशा भोवऱ्यात इकडून तिकडून हेलकावे खाताना दिसत. राजकीय नातेसंबंध हे समुद्र किनाऱ्यावरील "वाळूच्या किल्ल्या" सारखे असतात.. टिकतील तर टिकतील .. नाहीतर एका लाटेत नामोनिशाण मिटवून जातील.

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

माझ्या मते..

महाराष्ट्रात सध्या..

आघाडी विरूद्ध युती..

असा संघर्ष नसून..

शरद पवार साहेब

विरूद्ध

देवेंद्रजी फडणवीस

असा आहे.. !

राजकीय बुद्धिबळाच्या पटावरील पवार - फडणवीस हे "राजे" आहेत.

वजीर: उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत दादा.

हत्ती: अनिल परब आणि सुधीर मुनगंटीवार

उंट: संजय राऊत आणि प्रवीण दरेकर

बाकी सारी प्यादी..

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

महाराष्ट्रातील जनसामान्यांना..

कोरोनावरील व्हॅक्सीनची..

तर

महाराष्ट्रातील

असामान्य

राजकारण्यांना

कंडू (खाज) शामक

"सपट लोशन"ची

गरज आहे..

किती किती

खाजवाल..?

एकमेकांच्या समर्थनार्थ 'पाठी..'

आणि

विरोधकांच्या निर्दालनासाठी

भानगडींच्या

'गाठी..' !!

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

काय करणार आहोत आपण या कर्माला ???

एखाद्याचे "मूत्र" पॅथॉलॉजिस्टकडे जाऊन तपासून घेता येते..

पण..

न्यूज चॅनेल्स दावा करतात

"ते सूत्र"

तपासून घेणार

कसे ?

मग "वुईशफुल थिंकींग"च्या होतात..

ब्रेकींग न्यूज !

अफवांचे रूपांतर होते..

एक्स्लुझीव्ह न्यूज मध्ये..

"पेड न्यूज"

होते..

"विशेष"

आणि पहाणा-यांच्या पर्यंत पोचतात..

'बात' + 'मी' चे

शेष अवशेष.. !

www.abhijeetrane.in


 

🖋️ ABHIJEET RANE (AR)

'पार्थ अजितदादा पवार' यांच्या वाढदिवसानिमित्त..

न्यूज चॅनेल्सवर..

लाखो लाखो लाखो रुपयांच्या जाहिराती झळकल्या..

शिवाय तेवढ्याच बजेटच्या जाहिराती आणि विशेष पुरवण्या दैनिकांमधून आल्या..

तरी अजून कुणी "शंकासूर" महाराष्ट्रात आहे काय ?

की ज्याला 'पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजितदादा पवार असतील'..

याबद्दल शंका आहे ?

झाला झाला झाला !

बाप हो! निर्णय झाला ! फायनल!

पार्थ पवार उमेदवार !

निवडणुक बिनविरोध नाही.

दिवंगत राष्ट्रवादी

आमदार भारत भालके यांचा नातेवाईक भाजपाचा उमेदवार असू शकतो.

पार्थला उमेदवारी मिळवून देणे अजितदादांच्या हातात आहे..

पण निवडून आणणे "साहेबां" च्या मनात हवे..

अन्यथा 'लाॅटरी'चे तिकीट मिळाले..

पण 'लाॅटरी' लागली नाही'..

हा पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीतील अनुभव पुन्हा येऊ शकतो.

"साहेब" निवडून आणू शकतात असे नाही'..

पण 'पाडू' नक्की शकतात..

ही "दंतकथा" नाही.. शेकडोंनी अनुभवलेली "सत्यकथा" आहे !!

www.abhijeetrane.in


7 views0 comments

Comments


bottom of page