शिवराज्याभिषेकदिन गौरव पुरस्कार २०२५ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!
- dhadakkamgarunion0
- Jun 12
- 1 min read
समारंभ अध्यक्ष म्हणून प्रमोद पाटील व तर उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती
दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालय मधील सुरेंद्र गावस्कर सभागृहामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान, हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती आणि धडक कामगार युनियन महासंघ कडून आयोजित ‘शिवराज्यभिषेक दिन गौरव पुरस्कार २०२५’ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला!
या सोहळ्यात स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समारंभ अध्यक्ष म्हणून प्रमोद अप्पा पाटील व समारंभचे उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज व समारंभाचे विशेष अतिथी म्हणून शीतल मालुसरे, मैत्री संस्थेचे अध्यक्ष व आयोजक सुरज भोईर, संभाजीराव राजे जाधवराव, समारंभ स्वागताध्यक्षा अभिनेत्री व प्रसिद्ध सौंदर्य तज्ञ स्वाती ओक, संस्थापक अध्यक्ष विद्याविहार शिक्षण समिती विरार व सन्माननीय अतिथी मंगलाताई परब, कार्याध्यक्षा मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख शिवमती अनिताताई काळे, समाजसेविका व उद्योजिका व प्रमुख उपस्थिती म्हणून संगीता गुरव, समाजभूषण व पोलीस मित्र व सन्माननीय अतिथी दिलीप नारद आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या सोहळ्यात शंभरहून अधिक साहित्यिक,सामाजिक,कलाक्षेत्रात असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल शिवराज्यभिषेक दिन गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे व माझे अनेक वर्षांपासुनचे संबंध आहेत. माझ्या युनियनच्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ‘शिवराज्याभिषेकदिन गौरव पुरस्कार २०२५’ या सुरज भोईरने आयोजित कार्यक्रमास माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा व सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन!, असे यावेळी ते म्हणाले.
#शिवराज्याभिषेकदिन #गौरवपुरस्कार2025 #शिवराज्याभिषेक2025 #शिवभक्त #मराठीमराठीत #सुरेंद्रगावस्करसभागृह #प्रमोदपाटील #तात्यारावलहाने #अभिजीतराणे #स्वराज्यप्रतिष्ठान #हुतात्माबाबूगेनू #धडककामगारयुनियन #मराठीसाहित्य #शौर्यगौरव #शिवस्मरण




















Comentarios