top of page
dhadakkamgarunion0

विनाश काले विपरीत बुद्धी ..हे विधान मोदी किंवा शेतकरी संघटनेचे नेते किंवा राहुल गांधी ...



*@ABHIJEETRANE(AR)*

शीतल आमटे यांच्या आत्महत्ये संदर्भात आमटे परिवारातील कोणत्याही व्यक्तीची जबाबदारी निश्चित करण्यात पोलीस कोणाच्या दडपणाखाली टाळाटाळ करीत आहेत का ? एरवी आत्महत्या प्रकरणात मीडिया घेतो तशी चौकशी आणि कारवाई करण्याची भूमिका आमटे परिवाराच्या संदर्भात मीडिया घ्यायला तयार नाही हे लक्षात येते आहे का ?

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

मुस्लीम समाजाविषयी..

हिंदू समाजात निर्माण झाला / केला गेला..

तसा द्वेष मराठी माणसांच्या मनात उत्तर प्रदेश मधील लोकांविषयी निर्माण करण्यात..

काही राजकीय पक्ष आणि नेत्यांना यश मिळाले आहे..

असे वाटते का ?

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

धर्मापाल गुलाटी -- वय 98 -- मालक एम डी एच मसाले -- ह्यांचा व्यावसायिक यश आणि वैयक्तिक प्रतिमा उभारणीचा -- आदर्श - मी माझ्या पाच महागुरूपैकी एक म्हणून ठेवला होता आणि आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी राजकीय महागुरू - आदर्श मानतो. संजय राऊत हे पत्रकारितेतील आदर्श आहेत. अक्षय कुमार कला क्षेत्रात तर मेधा पाटकर आंदोलन कार्यात आणि डॉ. दत्ता सामंत हे कामगार चळवळीतील आदर्श आहेत. मी या सर्वांचा "एकलव्य" होतो आणि आहे. धर्मपाल गुलाटी यांना श्रद्धांजली !

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

मराठी साहित्यिकांनी घरबसल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला परिपत्रक काढून पाठिंबा देणे म्हणजे "हस्तमैथुन करून मुले जन्माला घालतो आहोत" असे म्हणण्यासारखे आहे.

www.abhijeetrane.in




*@ABHIJEETRANE(AR)*

जर मोदी आणि शहा शेतकरी आंदोलन यशस्वी रित्या हाताळू शकले नाहीत तर देशात दुसरा कोण आहे जो हा प्रश्न सोडवू शकेल ? विनाश काले विपरीत बुद्धी .. हे विधान मोदी किंवा शेतकरी संघटनेचे नेते किंवा राहुल गांधी यांच्या पैकी कुणाला लागू पडते हे आंदोलनाचा शेवट कसा आणि कोण करतो यावरून सिद्ध होईल हे लिहून ठेवा !

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्र शासनाने आज प्रसारित केलेल्या वर्षपूर्ती जाहिरातीत मुलगी मिनी स्कर्ट मध्ये दाखवली आहे .. ही मराठी संस्कृती आहे का? असे तोकडे कपडे घालणाऱ्या मुलीला साई मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही मग महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातीत कशी ? हे मराठी मुलीचे प्रातिनिधिक रूप आहे का? चौकशी आणि कारवाई होणार का? शिवाय जाहिरात निर्बुद्ध आणि कल्पकताशून्य आहे तो भाग वेगळाच !!

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

लसीकरण हा विषय अशा प्रकारे प्रचारीत - प्रसारीत केला जातो आहे की "कोरोना संपला आणि लस जाऊन फक्त घेऊन यायची खोटी" असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या भीतीचा सरकार आणि लोकांनी अतिरेक केला आता बेदरकार बिनधास्त बेजबाबदार निर्भयतेचा अतिरेक धोकादायक वळणावर / पातळीवर जाऊन पोचतो आहे . एक नक्की आता सरकारची लॉक डाऊन करण्याची हिम्मतच होणार नाही आणि तसा प्रयत्न केला तर लोक न जुमानता रस्त्यावर उतरून दंगली करतील. हात धुणे बंद झाले आहेच . सोशल डिस्टनसिंग हा विषय तर नेते लोकप्रतिनिधी पोलीस सरकार आणि लोक कधीच विसरून गेले आहेत. मास्क एवढा एकच मुद्दा पोलीस आणि महापालिका अधिकारी यांना गैरमार्गाने पैसे आणि दंड वसूल करण्यासाठी जिवंत आहे. जेव्हा अधिकृतपणे 100 रुपये दंड वसूल केला जातो तेव्हा किमान एक हजार रुपये रोख रक्कम भ्रष्टाचारातून वसूल केली जाते हे उघडे गुपित आहे.

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

समीर भुजबळ यांना अटक ती देखील ओबीसी आंदोलना दरम्यान आणि गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे असताना.. छगन भुजबळ यांच्या साठी धक्का की अटक हे नाटक की राष्ट्रवादी कडूनच भुजबळ यांचे राजकीय अवमूल्यन अधोगती चा प्रारंभ की भुजबळ यांना ओबीसी समाजाने नेते मानू नये अशी सुचक घडामोड ???

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

"ईडी मध्ये मी तुमची केस मॅनेज करून देतो" असे फोन करून करून एडीची नोटीस आलेल्या नेत्या अभिनेत्यांना भंडावून सोडलेल्या दलालांच्या कथा ऐकून होतो पण खरे वाटत नव्हते पण आज नार्कोटिक्स ब्युरोचे दोन अधिकारी कोमेडियन भारती प्रकरणात बडतर्फ झाल्याची बातमी न्यूज चॅनल वर पाहताना अशा दलालांचे अस्तित्व मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. हे दलाल जे फोन करत होते ते टॅप झालेच असणार. पण या दलालांना फोन टॅप होणार हे ठाऊक असताना हिम्मत होते ह्याचा अर्थ काय? काही वेळा नेते, अभिनेते ईडी समोर हजर होण्यासाठी जो वेळ लावतात त्यामागे मधल्या काळात काही डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न ते करीत असतात अशी चर्चा देखील ऐकायला मिळते ती खोटी नसावी.

www.abhijeetrane.in


*@ABHIJEETRANE(AR)*

आजी माजी नगरसेवक आणि अनेक तथाकथित मानवाधिकार किंवा माहिती अधिकार किंवा भ्रष्टाचार निर्मुलन संघटना यांचे पदाधिकारी यांचे जे मर्डर वारंवार जागोजागी गावोगावी होताना दिसतात त्यामागे 90% प्रकरणात खंडणी , हप्ते, अनधिकृत बांधकामे, ब्लॅकमेल, गँगवार अशी कारणे असतात.. पूर्वी परप्रांतीय बेरोजगार तरुणांना सुपाऱ्या देऊन अशा हत्या घडवून आणल्या जात असत पण हे अर्धे कच्चे आरोपी हमखास हत्या करण्यात अनेकदा अपयशी ठरतात किंवा सहज पकडले जातात आणि सुत्रधाराचे नाव पोलिसांना लगेच सांगतात असे लक्षात आल्यानंतर आता दुष्मनी असलेले लोक स्वतः किंवा स्वतः च्या मित्र बॉडीगार्ड कार्यकर्ते यांना घेऊन थेट क्लोज सर्किट टिव्ही समोर हत्या करू लागले आहेत. साधारणतः दीड दोन वर्षात जामीन मिळतो आणि खटला पाच दहा वर्षे चालतो तोपर्यंत साक्षीदार, पोलिस, न्याय यंत्रणा यात सूत्रधार अनेक उलाढाली घडवून आणतात आणि बहुसंख्य उदाहरणात निर्दोष सुटतात. बेकायदेशीर धंद्यातून 90 % हत्या होतात तेव्हा अनेकदा करणारा आणि ज्याची हत्या झाली तो दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले असतात त्यामुळे पोलिसांना परस्पर गुंड गुन्हेगार मारतात हे सोयीचे तर सर्वं सामान्यांना दिलासादायक वाटते. प्रत्यक्ष परमेश्वराने अनेक अवतारात राक्षसांना आपापसात लढवून दोघांचा वध किंवा हत्या घडवून आणल्या होत्या. सुंद आणि उपसुंद या राक्षसांना आपसात लढवून मारले या कथेवरूनच "सुनदोपसुनदी " हा शब्द प्रयोग सुरू झाला आहे. शेवटी राजकारणातही नेते एकमेकांच्या भानगडी भ्रष्टाचार काढतात म्हणून जगापुढे येतात हे नेते भांडले नाहीत आणि"'तेरी भी चूप, मेरी भी चूप" म्हणून गप्प बसतील तर त्यांची भांडाफोड कशी होणार? पोलिसांचे खबरे कधी सभ्य माणसे नसतात तर गुन्हेगारी विश्वातील गुन्हेगार असतात हे लक्षात घेऊन"लोहा लोहे को काटता है" चे स्वागत करायला हवे .

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या कायद्यांची अमलबजावणी अत्यंत कठोरपणे होते ही वस्तुस्थिती आहे. उद्योगपती धंदेवाले व्यावसायिक यांना ही बंधने जाचक वाटतात त्यामुळे अनेक उद्योग परराज्यात जातात हे कधी कुणी जाहीरपणे बोलत नाही पण ते एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे . पण "कायद्यांची कठोर अंमलबजावणी करू नका" असे कोण कसे म्हणणार ? महाराष्ट्र शासनाचे क्वालिफिकेशन चक्क डिस- क्वांलीफीकेशन ठरते आहे.. सांगा.. काय करायचे ?

www.abhijeetrane.in



*@ABHIJEETRANE(AR)*

आजवरचा इतिहास आणि शेकडो उदाहरणे यातून वारंवार सिद्ध झाले आहे की शरद पवार साहेब जे जाहीरपणे सांगतात बरोबर त्याच्या उलट ते प्रत्यक्षात करतात .. आज लोकमतच्या विजय दर्डा यांना मुलाखत देताना पवार साहेबांनी जाहीर केले की .. "सुप्रिया सुळे ह्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट नाही , त्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करीत राहतील त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यांनी घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही" चला ! आज एक नक्की झाले ! पवार साहेब नाही म्हणाले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या वहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रियाताई च असणार असणार असणार हें नक्की नक्की नक्की ! अजितदादा कायम उपमुख्यमंत्री राहणार की राष्ट्रवादी सोडणार आणि नवी राजकीय समीकरणे भाजपच्या सोबत जुळवणार ? कारण सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार नाही असे पवार साहेबांनी जाहीर केल्या नंतर आता सुप्रियाताई च होणार हे जर महाराष्ट्राने आजच गृहीत धरले आहे तर अजितदादाच्या हा मुखवटा आणि चेहऱ्याचा खेळ लक्षात येणार नाही असे कसे शक्य आहे ? महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या नियोजित महिला मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे यांना शुभेच्छा आणि अजितदादांच्यासाठी सांत्वना !!

www.abhijeetrane.in


15 views0 comments

Comments


bottom of page