top of page
dhadakkamgarunion0

विधीमंडळाचे अधिवेशन मुख्यमंत्री असताना आणि आता नसतानाही गाजवतात ते माननीय देवेंद्र फडणवीस हेच!

*@ABHIJEETRANE(AR)*

विधीमंडळाचे अधिवेशन मुख्यमंत्री असताना आणि आता नसतानाही गाजवतात ते माननीय देवेंद्र फडणवीस हेच!यावेळेस तर देवेंद्रजींच्या हाती आक्रमकपणे सत्तारूढ आघाडी सरकारवर डागायला तोफेत वापरायला दारूगोळ्याचे.. आरोपांबाबतच्या पुराव्यांचे.. कोठारच आहे. देवेंद्रजींच्या वक्तृत्वाला तलवारीची धार आहे. त्यांनी केलेले आरोप धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे "लक्ष्यवेध" करतात. ते आक्रमक असतात पण आक्रस्ताळे नसतात त्यामुळे आरडाओरड करून त्यांना अडवता येत नाही. एकाद्या निष्णात कायदेपंडिताने सर्वोच्च न्यायालयात मुद्देसूद युक्तिवाद करावा तसे देवेंद्रजींचे विधिमंडळातील भाषण हे पुराव्यांसह आपले आरोप सिद्ध करणारे असते. समोरच्यांना निरुत्तर करणारे भाषण ऐकून प्रतिपक्षही "काय आणि कसे उत्तर द्यावे" या संभ्रमात किंकर्तव्यमूढ होतो. देवेंद्र फडणवीस व्यक्ती मागील प्रवृत्तीवर, तिच्या गुन्हेगारी मानसिकतेवर प्रहार करतात त्यामुळे देवेंद्रजींच्या टीकेवर आक्षेप घेणे प्रतिपक्षाला अवघड जाते कारण त्यात चारित्र्यहनन नव्हे तर चारित्र्य विश्लेषण असते. देवेंद्रजींच्या समयोचित प्रगल्भ निर्णय क्षमतेचा अनुभव आपण पूजा आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडे मोहिमेची सूत्रे देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर राठोडांवरील कारवाईसाठी कसा नैतिक दबाव निर्माण केला यातून प्रत्यय आला. विद्यमान विधीमंडळात अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हे केंद्रबिंदू असणार आणि सारे अधिवेशन ते 'प्रभावित' करणार यात शंकाच नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा लोक म्हणत :"मुख्यमंत्री असावा तर असा" विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस लोक म्हणतात:"विरोधी पक्षनेता असावा तर असा" !

 

*@ABHIJEETRANE(AR)*

(एक्स्लुझीव्ह)

संजय राठोड यांनी उद्धवजींच्या सहनशीलतेची अक्षरशः परिक्षा पाहिली. राठोड इतक्या नीच थरापर्यंत गेले की "दिशा सालीयन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही माझ्यासारखीच बदनामी केली गेली होती पण ते निर्दोष होते तसाच मी आहे" असे म्हणण्याचा निर्लज्जपणा करण्यापर्यंत राठोडांची मजल गेली आणि अशी तुलना केल्यामुळे प्रचंड संतापलेल्या उद्धवजींनी राठोडांना "राजीनामा स्वीकारत" असल्याचे सांगून जवळ जवळ हाकलून दिले.

 

*@ABHIJEETRANE(AR)*

खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या अधिकारी व भाजपाशी संबंधित लोकांची नावे त्यांनी पत्रात लिहिली आहेत हे खरे आहे. ही नावे जशी मुंबई पोलीसांकडे आहेत तशीच उद्धवजींच्या कडेही आहेत. अर्थात केंद्र सरकारकडे देखील आहेत. उद्धवजींनी "खा.मोहन डेलकर यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई का होत नाही, राजीनामे का घेतले जात नाहीत ?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. पण पण पण.. मुद्दा असा की : 1) आत्महत्या मुंबईत घडली असल्याने तपास मुंबई पोलीसांकडे आहे तर ते ज्यांची नावे चिठ्ठीत आहेत ती जाहीर करून "त्या" नेत्यांना सहज एक्स्पोझ करू शकतात, मग का करीत नाहीत? 2) दस्तुरखुद्द उद्धवजी विधानसभेत या नावांचा गौप्यस्फोट करू शकतात मग करणार काय? भाजपाने स्वतःहून नावे जाहीर करून कारवाई करावी ही अपेक्षा भाबडेपणाची नाही काय? मुंबई पोलीसांकडून चिठ्ठीत उल्लेख केलेल्या व्यक्तींविरुद्ध अद्याप गुन्हा का दाखल केलेला नाही? या प्रश्नांची उत्तरे उद्धवजींना प्रत्यारोप करताना द्यावी लागतील!

 

*@ABHIJEETRANE(AR)*

मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इव्हेंट मॅनेजमेंट भलतीच आवडते. किती बारीक सारीक विचार करून ते एकेक गोष्ट करतात. आपण सार्वजनिक जीवनातील व्यक्तिंनी हा सेन्स बाळगून प्रत्येक उक्ती / कृती चमत्कृती वाटावी अशी केली पाहिजे. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की मी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श ठेवून प्रत्येक हालचाल, घडामोड, भेटीगाठी, सार्वजनिक स्वरूपातील प्रगटन, दर्शन, प्रदर्शन जाणीवपूर्वक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावशाली करण्याचा जमेल तेवढा प्रयत्न करतो. नाट्यशास्त्र असे सांगते की 'रंगमंचावरील प्रत्येक वस्तूला नाटकात प्रयोजन आणि उपयोग दिसला पाहिजे' .आपण सार्वजनिक स्वरूपात लोकांना दिसतो तेव्हा कपड्यांपासून केशभूषेपर्यंत सर्व ठरवून नियोजन करून असले तर तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेताना आसामी उपरणे गळ्यात , बंगाली टागोर स्टाईल दाढी, एक नर्स पाँडेचरीची तर दुसरी केरळमधील असा जो "योगायोग" या चार राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर घडवून आणला तो थक्क करणारा होता. साधा लस घेण्याचा प्रसंग मोदींनी "इव्हेंट" करून टाकला. जगात असे करण्याचे दुस-या कुणा नेत्याला सुचले नसते. पुन्हा या पूर्वनियोजित 'योगायोगा'ची यथेच्छ चर्चा करून विरोधकांनी एक प्रकारे मोदींना दादच दिली आहे ! धन्य ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्थक त्यांचे अनुकरण करून स्वतःला वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व देणारे त्यांचे माझ्यासारखे चाहते अनुयायी!!

 

*@ABHIJEETRANE(AR)*

एक्स्लुझीव्ह आणि अत्यंत महत्वाची बातमी.. भारतीय वर्तमानपत्रसृष्टीसाठी.. अद्याप अधिकृत घोषणा नाही हे खरे पण केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या दबावाखाली राज्य सरकारांना देखील घ्यावा लागेल.

एका स्नेहांकित केंद्रीय मंत्र्यांनी मला सांगीतले की :

मध्यंतरी केंद्र सरकारने दैनिकांची पुराव्याने शाबीत खपानुसार वर्गवारी करून जाहिरात दर मोठ्या प्रमाणावर वाढवून दिले होते. पण पण पण.. कोरोना आणि लाॅकडाऊन काळात आणि नंतर अजूनपर्यंत सरकारच्या माहितीनुसार बहुसंख्य वर्तमानपत्रांचा खप 30% ते 40% इतका खाली कोसळला आहे. त्यामुळे या वर्तमानपत्रांना वाढीव जाहिरात दर न देता त्यांच्या विद्यमान ख-या खपाच्या प्रमाणात नव्याने कमी जाहिरात दर निर्धारित करावेत अशी सूचना अर्थ मंत्रालयाकडून आली होती.

पण पण पण..

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व माध्यम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निर्णय घेतला की "कोरोना काळात वृत्तपत्रांवर कोसळलेले आर्थिक संकट आणि तरी त्यांनी बजावलेली कर्तव्यदक्ष भूमिका लक्षात घेऊन ज्या वर्तमानपत्रांना जे वाढीव जाहिरात दर दिले आहेत त्यात बदल केला जाणार नाही, तेच कायम राहतील"

फार मोठा दिलासा भारतीय वृत्तपत्र सृष्टीला मिळाला आहे.

मला वाटते की अजून मोजक्याच वृत्तपत्र मालकांना याची माहिती आहे.

आज मी ती सार्वजनिक करीत आहे.

दखल घ्या आणि मोदी-शहा-जावडेकरांना धन्यवाद द्या!

2 views0 comments

Comments


bottom of page