विकासाला पूररेषेची बेडी नको; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
- dhadakkamgarunion0
- Jun 15
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
विकासाला पूररेषेची बेडी नको; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
● राज्यातील अनेक नद्यांच्या काठांवर गेल्या अनेक वर्षांत पूरस्थिती उद्भवलेली नसतानाही, जुन्या पूर नियंत्रण रेषांच्या आधारे विकासकामांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे 'जिथे पूर येत नाही, तिथे नव्याने सर्वेक्षण करून पूर नियंत्रण रेषा निश्चित करा,' असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'उल्हास नदीच्या काठावर जुनी पूर नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष पूरस्थिती यामध्ये मोठा फरक आहे. जिथे अनेक वर्षांपासून पूर आला नाही, अशा ठिकाणी तीच पूररेषा कायम राहिल्यास स्थानिक विकास प्रकल्प खोळंबतात. 'नव्याने सर्वेक्षण करून पूर नियंत्रण रेषा निश्चित करा आणि त्यानुसार मार्गदर्शक तत्वे अद्ययावत करा,' असे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. विकास आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समतोल साधत, अचूक नियोजन आणि वेगवान अंमलबजावणीच्या माध्यमातूनच गावांपासून शहरांपर्यंत प्रगती साधता येईल, असे सांगून, सर्व संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments