top of page

वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना ‘चरणसेवा’चा आधार; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

  • dhadakkamgarunion0
  • Jun 15
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना ‘चरणसेवा’चा आधार; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

● पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी निघाले आहेत. या अध्यात्मिक यात्रेच्या प्रवासात त्यांच्या थकलेल्या पावलांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. राज्यात नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना फिजिओथेरपी आणि तत्काळ उपचाराच्या माध्यमातून आराम मिळावा, यासाठी सुमारे ५ हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील गाभा असलेल्या आषाढी वारीत सहभागी होताना वारकऱ्यांना होणाऱ्या शारीरिक त्रासावर उपाय म्हणून ‘चरणसेवा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवकांचा समावेश आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comentarios


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page