वारकरी शिष्टमंडळाने मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
- dhadakkamgarunion0
- Jun 18
- 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
वारकरी शिष्टमंडळाने मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील शासकीय निवासस्थानी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आगामी वारी व आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्य शासनाने आषाढी वारीतील दिंड्यांना दिलेले अनुदान आणि टोलमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयासाठी वारकरी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे आणि चिपळ्यांनी सन्मान करण्यात आला. शिष्टमंडळाने आषाढी यात्रेच्या व्यापक नियोजनाबरोबरच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीसह इतर महत्त्वाच्या सेवा-सुविधांबाबतही माहिती देण्यात आली.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comentarios